शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मपुरीत क्रीडा संस्कृतीला चालना

By admin | Updated: December 17, 2015 01:15 IST

सन्मित्र क्रीडा मंडळ व चंद्रपूर जिल्हा बॉस्केटबॉल असोसिएशनतर्फे ब्रह्मपुरी येथे राज्यातील नामवंत खेळाडू ३० डिसेंबर ते २ जानेवारीदरम्यान स्पर्धेसाठी ...

सन्मित्र बॉस्केटबॉल स्पर्धा : राज्यस्तरीय खेळाडूंना आमंत्रणब्रह्मपुरी : सन्मित्र क्रीडा मंडळ व चंद्रपूर जिल्हा बॉस्केटबॉल असोसिएशनतर्फे ब्रह्मपुरी येथे राज्यातील नामवंत खेळाडू ३० डिसेंबर ते २ जानेवारीदरम्यान स्पर्धेसाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गोसिखुर्द विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी दिली आहे.पत्रपरिषदेमध्ये माहिती देताना प्रा. अतुल देशकर म्हणाले, ब्रह्मपुरी ही क्रीडा नगरी असून ब्रह्मपुरीचे खेळाडू राज्यस्तरावर व राष्ट्रीय स्तरावर खेळले व प्रतिनिधीत्व केले आहे. या निमित्याने ब्रह्मपुरीत राज्यातील नामवंत खेडाळूस बोलावून क्रीडा नगरीत खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचा या मंडळाचा हेतू आहे. ही स्पर्धा पुरुष, महिला व बाल (१४ वर्षाखाली) अशा तीन गटात विभागली असून रोख पारितोषिके, चषक, ट्राफीज, उत्कृष्ठ खेळाडूंना विशेष पुरस्कार असे अंदाजे एक लाख पन्नास हजार रुपयांचे बक्षिसे ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेत भारतीय नौसेना, इंडियन जिमखाना मुंबई, सेंट्रल रेल्वे मुंबई, पुणे, नाशिक, सोलापूर, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, अकोला, चंद्रपूर इत्यादी नामवंत संघ भाग घेणार आहेत. डेप्युटी इन्सेक्टर जनरल आॅफ आॅफीसर राजेश कांबळे व सेल्स डायरेक्टर मिडल इस्ट अ‍ॅट आॅफ्रीका आशिष जगनाडे या दोन माजी खेळाडूंना गौरविण्यात येत आहे. या संपूर्ण स्पर्धेकरिता खासदार अशोक नेते, जि.प. अध्यक्ष संध्या गुरनुले, आमदार विजय वडेट्टीवार, रिता उराडे, धनंजय वेरुळकर, शत्रूघ्न गोखले, सिमा अहिरे, रिना जनबंधू, आमदार मितेश भांगडिया, आमदार अनिल सोले, आमदार संजय धोटे, मनोहर पाऊणकर, विजय संतान आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पत्रपरिषदेला प्रा. डॉ. अश्वीन चंदेल, प्रा. प्रकाश आयदे, दीपक उराडे, अतुल गौरशेट्टीवार, अन्वर शेख, परेश शहादाणी, पवन जयस्वाल उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)