शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

स्त्री अत्याचाराविरोधात ब्रह्मपुरीत मुकमोर्चा

By admin | Updated: November 3, 2016 02:14 IST

आवळगाव येथील काजल दुमणे हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षेची मागणी रेटून धरण्यासाठी

उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन : अनेक मागण्या रेटून धरल्या ब्रह्मपुरी : आवळगाव येथील काजल दुमणे हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षेची मागणी रेटून धरण्यासाठी ब्रह्मपुरी येथे भटक्या विमुक्त संघर्ष समितीतर्फे मुकमोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. भटके विमुक्ती संघर्ष समिती व एकलव्य सेनेद्वारे आयोजित स्त्री अत्याचाराच्या विरोधात व संपूर्ण स्त्री जातीत सामाजिक असुरक्षितता निर्माण झाल्यामुळे तसेच ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव येथील काजल राजेंद्र दुमणे या अल्पवयीन मुलीच्या हत्येच्या निषेधार्थ ब्रह्मपुरी येथील उपविभागीय कार्यालयावर मुक मोर्चाचे आयोजन आज बुधवारला करण्यात आले. याला जनतेने अभूतपूर्व प्रतिसाद दिला. अंदाजे १० हजार जनसमुदाय मोर्चा निघण्यापूर्वीच येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात उपस्थित होता. तिथून मोर्चा दुपारी १ वाजता उपविभागीय कार्यालयाकडे निघाला. सदर मोर्चा बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे चौक, क्रांतीवीर नारायण सिंह चौक ते मुख्य रस्त्याने सावरकर चौक, शिवाजी चौक मार्गे शिस्तबद्ध पध्दतीने मार्गक्रमण करीत राहिला. कोणताही अनुचित प्रकार न घडता अत्यंत शांतपणे मोर्चेकरी येथील तहसील कार्यालयातील उपविभागीय कार्यालयावर धडकले. त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांना एका शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले. भटक्या विमुक्त यांना न्याय देवून अ‍ॅक्ट्रासिटी लागू करण्यात यावा, आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी, जलदगती न्यायालयात खटला चालवून उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी, यासह अनेक मागण्यांचा निवेदनात समावेश होता. मोर्चात प्रामुख्याने गडचिरोली, सिंदेवाही, मूल, भिवापूर येथील असंख्य भोई समाजबांधव आबालवृद्ध हजर होते. मोर्चात आमदार विजय वडेट्टीवार, अशोक रामटेके, रिपाइं नेते, विनोद झोगडे, यशवंत दिघोरे, मिलींद भन्नारे, अश्विनी जनबंधू यांच्यासह असंख्य कार्यकर्तेही सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)