बोर्डाची परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:34 IST2021-02-17T04:34:16+5:302021-02-17T04:34:16+5:30

बल्लारपूर : एप्रिल महिन्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक १० वी व १२ वीची परीक्षा होत आहे. परंतु ...

Board exam online or offline? | बोर्डाची परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन?

बोर्डाची परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन?

बल्लारपूर : एप्रिल महिन्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक १० वी व १२ वीची परीक्षा होत आहे. परंतु अजूनही ही परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन होणार, याची कल्पना विद्यार्थ्यांना नसल्यामुळे विद्यार्थी व पालक संभ्रमात आहेत.

यासंदर्भात श्री बालाजी शाळेचे शिक्षक संघपाल रामटेके यांनी सांगितले की, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता १२ वी परीक्षाच्या सूचना आल्या आहेत. परंतु ही परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन होणार, याची सूचना अजून आली नसल्यामुळे आम्हाला विद्यार्थी विचारतात. १० वीची परीक्षा २९ एप्रिलपासून तर १२ वीची २३ एप्रिलपासून होणार आहे. या परीक्षेचा कालावधी २३ एप्रिल ते २९ मे असा आहे. ऑनलाईन परीक्षा घरूनही देता येते तर, ऑफलाईन परीक्षा केंद्रावर घेतल्या जाते.

Web Title: Board exam online or offline?