शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून घातली दु:खावर फुंकर

By admin | Updated: July 6, 2014 23:50 IST

वेकोलिच्या मुंगोली कोळसा खाणीत कार्यरत एका तेलगु भाषिक कामगाराच्या मुलीचे लग्न जुळले. आयुष्याची मोठी जबाबदारी हलाखीच्या परिस्थितीत कशी पार पाडावी, याची चिंता त्यांना अस्वस्थ करायची.

कामगार एकवटले : वधुपित्यावर तिहेरी संकटगजानन साखरकर - घुग्घुसवेकोलिच्या मुंगोली कोळसा खाणीत कार्यरत एका तेलगु भाषिक कामगाराच्या मुलीचे लग्न जुळले. आयुष्याची मोठी जबाबदारी हलाखीच्या परिस्थितीत कशी पार पाडावी, याची चिंता त्यांना अस्वस्थ करायची. अशातच त्यांची प्रकृती बिघडली. हैदराबादमध्ये त्यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले. उपचाराचा खर्च, मुलीचे लग्न आणि दुसरीकडे दुसऱ्या मुलीच्या शिक्षणाचा प्रश्न, यामुळे ते कोसळलेच. मात्र मुंगोली खाणीच्या कर्मचाऱ्यांनी लोक वर्गणी गोळा करून त्याच्या मुलीचे लग्न लावून दिले. एवढ्यावरच हा जिव्हाळा थांबला नाही तर दुसऱ्या मुलीच्या शिक्षणासाठी १५ हजार रुपये होस्टेलची रक्कम लोकवर्गणीतून जमा केली. कामगारांनी दाखविलेला सामाजिक बांधिलकीचा हा प्रत्यय अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.कासरला ऐकटी असे या दुर्दैवी कामगाराचे नाव आहे. ते वेकोलिच्या मुंगोली खुल्या कोळसा खाणीत कार्यरत आहेत. आठ महिन्यापूर्वी हैदराबादच्या मुलाशी त्यांच्या मुलीचे लग्न जुळले. मुलीचे लग्न लावून देणे हा वडीलांच्या आयुष्यातील मोठी जबाबदारी. हलाखीची परिस्थिती असली तरी ते या तयारीला लागले. अचानक त्यांची प्रकृती खराब झाली. त्यांना हैद्राबादच्या दवाखान्यात उपचाराकरिता दाखल केले असता कर्करोग असल्याचे निदान करण्यात आले. महागडा औषधोपचार, मुलीचे तोंडावर आलेले लग्न व दुसऱ्या मुलीचे शिक्षण, यामुळे ते आजाराने खचले नाही, तेवढे खचले. खाणीतील इतर कामगारांना त्यांची ही अवस्था समजली. सर्व कामगार कासरला यांच्या मदतीकरिता समोर आले. लोकवर्गणीतून एक लाख वीस हजार रुपयांची मदत गोळा करण्यात आली. त्यातून त्यांच्या मुलीचा नियोजित विवाह लावून देण्यात आला. त्यांच्या हैद्राबाद येथे शिकत असलेल्या दुसऱ्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारीही कामगारांनी स्वीकारुन होस्टेलची १५ हजार रुपये फि भरली.