शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

गाडेगावच्या स्वस्त धान्य दुकानात काळाबाजार

By admin | Updated: June 7, 2014 23:50 IST

गेल्या अनेक वर्षांपासून गाडेगाव येथील शासकीय स्वस्त धान्य दुकानात धान्य व केरोसीनचा काळाबाजार सुरू आहे. यावर नियंत्रण आणून दुकानदारावर कारवाई व्हावी याठी गावकर्‍यांनी अनेकदा संबंधित

गडचांदूर : गेल्या अनेक वर्षांपासून गाडेगाव येथील शासकीय स्वस्त धान्य दुकानात धान्य व केरोसीनचा काळाबाजार सुरू आहे. यावर नियंत्रण आणून दुकानदारावर कारवाई व्हावी याठी गावकर्‍यांनी अनेकदा संबंधित अधिकार्‍यांकडे तक्रारी केल्या. मात्र काहीच निष्पन्न न झाल्याने ग्रामवासीयांनी विशेष आमसभेची मागणी केली. त्यानुसार शनिवारी देवानंद आनंदराव ठाकरे यांचा सरकारी स्वस्त धान्य केंद्राचा परवाना रद्द करण्यासंदर्भात ग्रामसभेत ठराव घेण्यात आला. ग्रामसभेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे आजघडीला संपूर्ण बीपीएल, एपीएल व अंत्योदय अशा सर्वच शिधापत्रिका दुकानदाराकडेच असून ग्राहकांना त्या मिळाल्या नाहीत. अन्न सुरक्षा योजनेची यादी प्रसिद्ध करण्यात आली नाही. शिधापत्रिकाधारकांना धान्य व केरोसीनचा पुरवठा जादा भावाने करण्यात येत आहे. भावदर्शक फलक लावण्यात आले नाही. याबाबत वारंवार निवेदने देऊनसुद्धा कोणत्याही पुरवठा अधिकार्‍यांनी चौकशी करण्याची गरज दाखविली नाही. २९ मे रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी व कोरपना तहसीलदारांना निवेदन देण्यात आले होते. मात्र त्यांनी साधी चौकशी करण्याचे सौजन्यही दाखविले नसल्याचा आरोप गावकर्‍यांनी केला आहे.देवानंद ठाकरे हे गावचे पोलीस पाटील असून सरकारी स्वस्त धान्य दुकान, केरोसीन परवाना, किराणा दुकान व कृषी केंद्राचे ते मालक आहेत. स्वत:च्या किराणा दुकानातून ते सरकारी स्वस्त धान्य विकत असल्याचाही गावकर्‍यांचा आरोप आहे. अंत्योदय व बीपीएलधारकांना अनुक्रमे ३५ ते ४४ किलो तांदूळ व गहु वाटप करायचे असतात. तसेच तांदळाचा सरकारी भाव ६ रुपये किलो व गव्हाचा सरकारी भाव ५ रुपये किलो असताना त्याची बेभाव विक्री केली जात आहे. अंत्योदय व बीपीएलधारकांना १३.५0 किलो साखरेचा भाव असताना २२ ते २५ रुपय दराप्रमाणे विकण्यात येत आहे. गावकर्‍यांना धान्याचा सरकारी भाव व प्रतिकार्ड भाव किती आहे, हे माहित नसल्याने गावकरी गप्प होते. मात्र आता गावकर्‍यांचे डोळे उघडले असून देवानंद ठाकरे यांच्या विरोधात गावकर्‍यांनी बंड पुकारले आहे.कार्डधारकांना उद्धट वागणूक देत शिवीगाळ करणे, पैशाचा हिशेब न सांगणे, भाव फलकावर भाव नमूद नसणे, तोंडी भाव विचारल्यास बरोबर भाव न सांगता उडवाउडवीची उत्तरे देऊन परत करणे, अशा अनेक तक्रारी आहेत. निवेदनाच्या प्रती पालकमंत्री संजय देवतळे, खासदार हंसराज अहीर व आमदार सुभाष धोटे यांना देण्यात आल्या आहेत. चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रा.पं. सदस्य ओमप्रकाश राजुरकर, दादाजी देवतळे, सूर्यभान राजुरकर, साधुजी देवतळे  यांच्यासह गावकर्‍यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)