काँग्रेसच्या विजय सभेत भाजप कार्यकर्त्यांचा धुडघूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:30 IST2021-01-19T04:30:25+5:302021-01-19T04:30:25+5:30

फोटो गोंडपिपरी /धाबा : गोंडपिपरी तालुक्यातील एकूण ४३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा सोमवारी निकाल लागला. निकाल आटोपून स्वगावी परतलेले ...

BJP workers in the Congress' victory rally | काँग्रेसच्या विजय सभेत भाजप कार्यकर्त्यांचा धुडघूस

काँग्रेसच्या विजय सभेत भाजप कार्यकर्त्यांचा धुडघूस

फोटो

गोंडपिपरी /धाबा : गोंडपिपरी तालुक्यातील एकूण ४३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा सोमवारी निकाल लागला. निकाल आटोपून स्वगावी परतलेले काँग्रेसचे धाबा येथील प्रभाग क्रमांक १ चे तीनही विजयी उमेदवार यांनी मतदारांचे आभार मानण्याकरिता औपचारिकरीत्या विजय सभेचे आयोजन केले. याचदरम्यान तेथीलच भाजपा पक्षाचा कार्यकर्ता असलेल्या सूरज भस्की नामक युवकाने विजय सभेत धुडगूस घालण्याचा प्रयत्न करताच दोन्ही गटात बाचाबाची झाली.

पोलिसांनी मध्यस्थी करून प्रकरणाचा निपटारा करण्याचा प्रयत्न केला. मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी संबंधित भाजप कार्यकर्त्यावर कारवाई करण्याची आग्रही भूमिका घेत चक्क पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता सूरज भस्की या युवकास तत्कालीन सरपंचाच्या घरून ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. घटना लिहिस्तोवर पोलिसांनी संबंधित भाजप कार्यकर्त्यावर कुठलीही गुन्ह्याची नोंद केलेली नव्हती.

Web Title: BJP workers in the Congress' victory rally