शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

गरीबांना वीज बिल माफीसाठी भाजप रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 05:01 IST

२२ मार्चपासून लॉकडाऊन सुरु झाले. या काळात गोरगरीब जनता आर्थिक संकटात सापडली. १ एप्रिलपासून या सरकारने वीज दरात वाढ करत जनतेशी बेईमानी केली. ०-१०० या स्लॅब मध्येसुद्धा वाढ करत राज्यातील जनतेवर अन्याय केला. लॉकडाऊनच्या काळातील गरीबांची वीज बिले माफ करावी, या मागणीसाठी आम्ही या आंदोलनाचा शंखनाद केला आहे. हा आंदोनलाचा पहिला टप्पा आहे.

ठळक मुद्देवीज बिलाची होळी : आंदोलन तीव्र करण्याचा मुनगंटीवारांचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लॉकडाऊन कालावधीतील गरीबांची वीज बिले माफ करा या मागणीसाठी चंद्रपूर जिल्ह्यात भाजप रस्त्यावर उतरली. काही ठिकाणी वीज बिलाची होळी केली, तर काही ठिकाणी राज्य शासनाचा निषेध नोंदविण्यात आला. बल्लापुरात निषेध नोंदविताना माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गरीबांचे वीज बिल माफ झाले नाहीत तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.२२ मार्चपासून लॉकडाऊन सुरु झाले. या काळात गोरगरीब जनता आर्थिक संकटात सापडली. १ एप्रिलपासून या सरकारने वीज दरात वाढ करत जनतेशी बेईमानी केली. ०-१०० या स्लॅब मध्येसुद्धा वाढ करत राज्यातील जनतेवर अन्याय केला. लॉकडाऊनच्या काळातील गरीबांची वीज बिले माफ करावी, या मागणीसाठी आम्ही या आंदोलनाचा शंखनाद केला आहे. हा आंदोनलाचा पहिला टप्पा आहे. गरिबांच्या वीज बिलासाठी या सरकारजवळ पैसे नाहीत, आरोग्य सुविधांसाठी पैसे नाहीत, ज्यांच्या जवळ रेशन कार्ड नाहीत त्यांना धान्य देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. मात्र राज्य सरकारने यासाठी काहीच केले नाही, असा आरोपही यावेळी मुनगंटीवार यांनी केला. भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, नगराध्यक्ष हरिश शर्मा, चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, रेणुका दुधे, काशिसिंह, मनीष पांडे, निलेश खरबडे, अजय दुबे, शिवचंद द्विवेदी, राजु गुंडेट्टी, मिना चौधरी, राजू दारी, कनकम कुमार, समीर केने, आशिष देवतळे, बुचय्या कंदीवार उपस्थित होते. आंदोलनात भाजपाचे सर्व नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी व कार्यकर्ते सोशल डिस्टंसिंग पाळून सहभागी झाले होते.चिमूर व तळोधी (बा.) येथे आ. कीर्तीकुमार भांगडिया यांच्या नेतृत्वात, ब्रह्मपुरी येथे माजी आमदार प्रा. अतुल देशकर, मूल येथे जि.प. अध्यक्ष संध्या गुरनुले, घुग्घुस येथे भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, राजुरा तालुक्यातील विहिरगाव येथे विदर्भ राज्य समितीच्यावतीने माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारmahavitaranमहावितरण