शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
PM मोदी यांनी जॉर्जिया मेलोनी यांना गिफ्ट केले 'मेलोडी चॉकलेट्स'! इटलीच्या पंतप्रधान व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
3
Top Marathi News LIVE Updates: गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
4
घरगुती क्रिकेट गाजवलं, आयपीएलमध्ये चमकले; आता थेट भारतीय संघात निवड, कोण आहेत 'हे' ४ खेळाडू!
5
Indian Railway आता Logo बदलणार, मंत्रालयाचा होकार; नवे काय पाहायला मिळेल, डिझाइन कसे असेल?
6
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
7
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
8
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
9
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
10
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
11
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
12
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
13
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
14
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
15
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
16
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
17
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
18
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
Daily Top 2Weekly Top 5

भाजप-काँग्रेस आमने-सामने येणार; 'क्रॉस व्होटिंग' ठरणार निर्णायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 14:22 IST

Chandrapur : वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची आगामी विधान परिषद निवडणूक केवळ राजकीय लढत नसून विदर्भातील बदलत्या सत्तासमीकरणांची 'सेमीफायनल' मानली जात आहे.

चंद्रपूर : वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची आगामी विधान परिषद निवडणूक केवळ राजकीय लढत नसून विदर्भातील बदलत्या सत्तासमीकरणांची 'सेमीफायनल' मानली जात आहे. वरकरणी ही निवडणूक आकड्यांची वाटत असली तरी प्रत्यक्षात 'मतदार व्यवस्थापन', गुप्त रणनीती आणि शेवटच्या क्षणी बदलणारी निष्ठा यावरच विजयाचा मार्ग ठरणार असल्याचे चित्र आहे. १९९४ मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर या जागेवर वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांचेच वर्चस्व राहिले. गडचिरोलीला अद्याप थेट नेतृत्वाची संधी मिळालेली नाही. यावेळी 'गडचिरोलीला प्रतिनिधित्व' हा भावनिक मुद्दाही चर्चेत येण्याची शक्यता आहे.

राजकीय या मतदारसंघाचा इतिहास पाहता केवळ संख्याबळ नव्हे तर मतदार व्यवस्थापन आणि राजकीय समीकरणेही तितकीच महत्त्वाची ठरल्याचे दिसते. १९९४ मध्ये रामदास तडस अपक्ष म्हणून विजयी झाले. त्यानंतर २००० मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला. २००६ मध्ये काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर जैनुद्दीन जव्हेरी यांनी बाजी मारली. २०१२ मध्ये मितेश भांगडिया भाजप समर्थित अपक्ष म्हणून निवडून आले, तर त्यानंतर भाजपचे रामदास आंबटकर यांनी विजय मिळवत पक्षाचे वर्चस्व निर्माण केले. मात्र ३० एप्रिल २०२५ रोजी त्यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली आहे.

काँग्रेस-भाजपसमोरही यावेळी कठीण आव्हान

तिन्ही जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुमारे २५० मतदार असून भाजप आणि काँग्रेस जवळपास तुल्यबळ स्थितीत असल्याचे चित्र आहे. विशेषतः चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसचे संख्याबळ निर्णायक मानले जात आहे. यामुळे निवडणुकीचा निकाल 'क्रॉस व्होटिंग', अपक्षांची भूमिका आणि शेवटच्या क्षणी होणाऱ्या राजकीय समीकरणांवर अवलंबून राहणार असल्याची चर्चा आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकांमध्ये मतदारांची पळवापळवी, गुप्त मतदान आणि पक्षांतर्गत नाराजी अनेकदा निर्णायक ठरते. त्यामुळे स्पष्ट संख्याबळ असूनही कोणत्याही पक्षाला विजय निश्चित मानता येत नाही.

इच्छुकांची मोठी फौज

काँग्रेसकडून शिवानी वडेट्टीवार आणि माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. दुसरीकडे भाजपमध्ये माजी खासदार रामदास तडस, माजी आमदार दादाराव केचे व मितेश भांगडिया यांच्या नावाची चर्चा असून चंद्रपूरचे नगरसेवक सुभाष कासनगोट्टवार हेही इच्छुक आहेत.

'क्रॉस व्होटिंग' आणि मतदार व्यवस्थापन

या सर्व पार्श्वभूमीवर वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली विधान परिषद निवडणूक ही केवळ एक जागेची निवडणूक न राहता विदर्भातील आगामी स्थानिक राजकारणाची दिशा ठरवणारी लढत ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

भाजपकडून ऐनवेळी गुलदस्त्यातील नाव येणार ?

या निवडणुकीत भाजपमधील चर्चेतील नावे बाजूला पडून ऐनवेळी गुलदस्त्यातील नाव बाहेर येण्याची शक्यता आहे. नागपूर येथील भाजपशी जोडलेल्या एका उद्योजकाला ऐनवेळी उमेदवारी घोषित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राजकारणात शेवटच्या क्षणी काहीही होऊ शकते त्यामुळे इच्छुकांचे धाबे दणाणले आहे.
 

English
हिंदी सारांश
Web Title : BJP-Congress Face-Off: 'Cross Voting' Decisive in Vidarbha Council Polls

Web Summary : Vidarbha Council election sees BJP, Congress in close contest. Cross-voting, voter management, and last-minute alliances will determine the outcome. Key candidates are in discussion, with potential surprises from BJP.
टॅग्स :nagpurनागपूरcongressकाँग्रेसBJPभाजपा