शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

भट्टीजांबची शेती पाण्याअभावी करपली

By admin | Updated: October 31, 2015 02:01 IST

जांबभट्टी येथील संयुक्त वनव्यवस्थापन समिती ही वन, वन्यजीव व जैवविविधता संरक्षण, संर्वधन व व्यवस्थापन कामात दशकापासून सक्रियतेने कार्यरत आहे.

शेतकरी अडचणी : आसोलामेंढा नहराचे पाणी पोहचतच नाहीमूल : जांबभट्टी येथील संयुक्त वनव्यवस्थापन समिती ही वन, वन्यजीव व जैवविविधता संरक्षण, संर्वधन व व्यवस्थापन कामात दशकापासून सक्रियतेने कार्यरत आहे. ग्रामस्थांच्या शेतीला दरवर्षी आसोलामेंढा नहराच्या तलावाद्वारे सिंचन व पाटबंधारे विभाग सावलीअंतर्गत पाणी पुरवठा होत असतो. परंतु सिंचन व पाटबंधारे विभागातील अभियंताच्या दुर्लक्षितपणामुळे दोन वर्षापासून आसोलामेंढा नहराचे पाणी शेतीला मिळत नसल्यामुळे भट्टीजांब व परिसरातील इतर गावाच्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिके करपली आहेत. यंदा अल्प पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. असोलामेंढा तलावाचे पाणी दरवर्षी नियमीत मिळाल्यास शेतकऱ्यांना लाभ मिळू शकेल, तसेच दुसऱ्या नहराची व्यवस्था झाल्यास सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटू शकणार आहे. याबाबत शासनाने तातडीने दखल घेवून वनसंरक्षण करणाऱ्या वनसेवकांच्या समस्यांचे निराकरण करावे यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना ग्रामस्थांनी निवेदन दिले आहेत. पिक संरक्षणासाठी सिंचनाची सुविधा त्वरेने करावी, असे आवाहन भट्टीजांबवासियांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)