शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

भद्रावतीकरांनी केला स्वच्छतेच्या सप्तपदीचा संकल्प

By admin | Updated: November 5, 2015 01:26 IST

स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत आपण स्वच्छतेच्या सप्तपदीचा संकल्प करतो, असे म्हणत नगरपालिका सभागृहात

भद्रावती : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत आपण स्वच्छतेच्या सप्तपदीचा संकल्प करतो, असे म्हणत नगरपालिका सभागृहात उपस्थित शेकडो भद्रावतीकरांनी शपथ घेतली. माझे पहिले पाऊल स्वच्छतेच्या सहभागाच्या ठाम निर्धाराने येथून तर सातवे पाऊल हरित स्वच्छ महाराष्ट्र साकारण्याचे असेल, असा याप्रसंगी संकल्प करण्यात आला.केंद्र शासनाच्या निर्देशानुसार स्वच्छ भारत अभियानाची परिणामकारण अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने सोमवारी न.प. सभागृह भद्रावती येथे ‘स्वच्छ भद्रावती, हरित भद्रावती’ संकल्पना राबविणे याबाबत न.प.तर्फे एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे भद्रावती येथील शाळेपासून विविध कार्यालय, तसे विविध संघटनांपासून डॉक्टर्स, वकील, प्राध्यापक व शहरातील प्रतिष्ठित नागरिक या सभेला उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार बाळू धानोरकर होते. नगराध्यक्ष अनिल धानोरकर, चंद्रपूर मनपा उपायुक्त डॉ.विजय इंगोले, न.प. उपाध्यक्ष प्रफुल चटकी, पोलीस उपनिरीक्ष हेमने, मुख्याधिकारी विनोद जाधव आदी व्यासपीठावर उपस्थित होते.भद्रावतीचे नागरिक सुजाण व जागृत आहेत. भद्रावतीच्या विकासात सर्वांचे योगदान आहे. सर्वांनी निर्धार केल्यास शहरात स्वच्छता नक्कीच नांदेल असे उद्गार याप्रसंगी आमदार बाळू धानोरकर यांनी व्यक्त केले. भद्रावती शहराला सुंदर, स्वच्छ, हिरवे व निरोगी बनविण्यासाठी ‘स्वच्छ भद्रावती, हरित भद्रावती’ हे अभियान राबविण्यात येत असून अभियान यशस्वी करण्यासाठी शहरातील नागरिकांनी अगदी मनापासून सहकार्य करावे व स्वच्छतेच्या बाबतीत भद्रावतीला शिखरावर पोहचवावे, असे आवाहन नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी याप्रसंगी केले.याप्रसंगी स्वच्छतेबाबतची फिल्म दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन प्रा. सचिन सरपटवार तर प्रास्ताविक तथा फिल्मचे सादरीकरण मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी केले. कार्यक्रमाला विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह पालिकेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)