शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात सापांपासून सावधान, चंद्रपूर जिल्ह्यात विषारी सापांच्या केवळ चार प्रजाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:37 IST

शेतात किंवा काडीकचरा असलेल्या तसेच ओलावा असणाऱ्या ठिकाणी काम करताना सांभाळून काम करावे, जोपर्यंत सापाला इजा होत नाही. तोपर्यंत ...

शेतात किंवा काडीकचरा असलेल्या तसेच ओलावा असणाऱ्या ठिकाणी काम करताना सांभाळून काम करावे, जोपर्यंत सापाला इजा होत नाही. तोपर्यंत तो कुणालाही दंश करीत नाही, त्यामुळे साप दिसताच त्याला न मारता सर्पमित्राला बोलवावे व शेतकऱ्याच्या मित्राचे रक्षण करावे, असे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे.

बॉक्स

साप आढळला तर

शेतात, काडीकचरा असलेल्या ठिकाणी, छोटे-छोटे बिड असणाऱ्या ठिकाणी साधारणत: साप आढळून येतात. साप दिसल्यानंतर लगेच घाबरुन न जाता, सर्पमित्राला प्राचारण करावे, सर्पमित्र येईपर्यंत त्याच्याकडे लक्ष ठेवावे. आपल्यासमोर एकच साप असेल तर एकाच जागी स्थिर राहावे, त्याचे लक्ष विचलित करण्यासाठी त्याच्या बाजूला एखादी वस्तू फेकावी. जेणेकरून त्याचे लक्ष विचलीत होईल. सर्पमित्र येईपर्यंत त्याच्याकडे लक्ष ठेवावे.

-------

बॉक्स

साप चावला तर

सर्वदंश झाल्यानंतर सापाच्या विषाने मृत्यू होण्यापेक्षा घाबरुन जास्त मृत्यू होत असल्याची उदारणे आहेत; परंतु साप चावल्यानंतर घाबरुन न जाता ज्या ठिकाणी दंश झाला असेल, त्या ठिकाणाहून साधारण तीन ते चार इंच अंतरावर आवळपट्टी बांधावी. कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला बळी पडून मांत्रिकाकडे जावू नये, आपल्या परिसरातील डॉक्टरांकडे जावून त्वरित उपचार घ्यावा.

-------

कोट

नुकतीच पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. गाव-खेड्यासह शहरी भागात साप निघण्याचे प्रमाण वाढले आहे. साप निघाल्यास आपल्या संपर्कातील सर्परक्षक,-सर्पमित्र यांना बोलवावे. सापाची माहिती नसेल तर पकडण्याचा किंवा हुसकावण्याचा प्रयत्न करू नये. सर्पदंश झाल्यास घाबरून न जाता, आवश्यक प्रथमोपचार करा, बुवाबाजी, मांत्रिक किंवा गावठी उपचारात वेळ घालवू नका. सर्पदंशावर शासकीय रुग्णालयात ‘प्रति सर्प विष' उपलब्ध असते. त्यामुळे लगेच प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा नजिकच्या रुग्णालयात जावे. प्रत्येक साप विषारी नसतो, आपल्यास झालेला सर्पदंश बिनविषारी सापाचा असू शकतो.

बंडू धोतरे,

अध्यक्ष इको-प्रो तथा सर्पमित्र.

------

बॉक्स

जिल्ह्यात आढळणारे बिनविषारी साप

अजगर, धामण, तस्कर, गवत्या, दिवड, धोंड्या, वाश्या, नानेटी, धुळनागीण, कवड्या, कुकरी, वाड्या, डुरक्या घोणस, मांडूळ, रुका, झाड साप, ब्लॅक हेडेड आदी बिनविषारी साप आढळून येतात.

-----

नाग : नागाचे विष सर्वात जहाल असते. नाग ओळखण्याची सर्वात मोठी खूण म्हणजे त्याचा फणा. नागाच्या फण्याच्या मागील बाजूस दहा किंवा शून्याचा आकडा असतो. काळ्या किंवा तपकिरी रंगाचे नाग जास्त आढळून येतात.

------

मण्यार : मण्यार किंवा मनेर ही भारतात आढळणारी विषारी प्रजात आहे. मण्यार सापाचे विष नागासारखेच असते. साधारणत: हा साप जंगल परिसरात आढळून येतो. सापाचा रंग पोलादी निळा असून, अंगावर पांढरे खवले असतात. हे खवले शेपटीकडे अधिक व डोक्याकडे कमी- कमी होत जातात.

----

घोणस : घोणस सापाचे विष अतिशय जहाल असते. या सापाच्या अंगावर साखळीसारख्या, तीन समांतर रेषा असतात. घोणस, हिरवा, पिवळा, हलका करडा रंग, व इतर अनेक रंगछटामध्ये आढळतो.

-----

फुरसे : हा साप ग्रामीण भागात फरुड या नावाने ओळखला जातो. याचा रंग तपकिरी, फिक्कट पिवळसर किंवा वाळूसारखा असतो. पाठीच्या दोन्ही बाजूवर एकेक, फिक्कट पांढरी नागमोडी रेषा असते. हा प्रमुख विषारी सापांपैकी एक आहे.