लाभार्थ्यांचे अनुदान गावोगावी थेट पोहचावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:19 IST2021-06-17T04:19:52+5:302021-06-17T04:19:52+5:30

घोसरी : संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना या सामाजिक अर्थसहाय्याच्‍या योजनेच्‍या वयोवृद्ध, अपंग लाभार्थ्‍यांना आपत्ती व्यवस्थापन, साथरोग ...

Beneficiaries' grants should be delivered directly to the villages | लाभार्थ्यांचे अनुदान गावोगावी थेट पोहचावे

लाभार्थ्यांचे अनुदान गावोगावी थेट पोहचावे

घोसरी : संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना या सामाजिक अर्थसहाय्याच्‍या योजनेच्‍या वयोवृद्ध, अपंग लाभार्थ्‍यांना आपत्ती व्यवस्थापन, साथरोग कायद्यातील तरतुदीनुसार बँकांनी पूर्वीप्रमाणे गावोगावी लाभार्थ्यांपर्यंत पोहचून द्यावे, असे निर्देश विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

सामाजिक अर्थसहाय्य योजनेच्या मासिक अनुदानासाठी बँकेसमोर रांगेत उभे राहतात. त्यात वयोवृध्‍द, अपंग लाभार्थी असतात. कोरोना काळात हे योग्‍य नाही. त्यामुळे गावागावात पोहचण्याबाबत तहसीलदारांना सर्व बँकांना पत्र पाठवून कार्यवाहीचे निर्देश दिले.

आ. मुनगंटीवार यांनी पोंभुर्णा तालुक्‍यातील लोकप्रतिनिधींच्‍या मागणीच्‍या अनुषंगाने मंगळवारला ऑनलाइन बैठक घेतली. बैठकीला पोंभुर्णाचे तहसीलदार, वि‍विध बँकांचे शाखा व्‍यवस्‍थापक, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, ईश्‍वर नैताम, नगर पंचायत मुख्‍याधिकारी सिध्‍दार्थ मेश्राम, मोहन चलाख, जिल्‍हा परिषद सदस्‍य राहुल संतोषवार, अजित मंगळगिरीवार, सुनीता मॅकलवार, पंचायत समिती सदस्‍य विनोद देशमुख आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. तहसीलदार यांनी त्‍वरित सर्व बँकांना यासंबंधीचे पत्र पाठविण्‍यात येईल, असे आश्‍वासन आ. मुनगंटीवार यांना दिले. नवेगांव मोरे येथील बँक ऑफ इंडियाच्‍या व्‍यवस्‍थापकांनी पोलीस शिपाई उपलब्‍ध करण्‍याची मागणी केली असता त्‍वरित पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून पोलीस उपलब्‍ध करून देण्‍याचे आश्‍वासन आ. मुनगंटीवार यांनी दिले. बँकेसमोर मंडप टाकून बसण्‍यासाठी खुर्ची, पिण्‍यासाठी पाण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍याच्‍या सूचना भाजपा पदाधिकाऱ्यांना दिल्या.

Web Title: Beneficiaries' grants should be delivered directly to the villages