नऊ शाळांमध्ये वाजली घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 05:00 IST2020-07-10T05:00:00+5:302020-07-10T05:00:48+5:30

माध्यमिक विद्यालय गोविंदपूर, अरूणभाऊ झाडे विद्यालय नांदेड, प्रशांत विद्यालय किटाळी, सरस्वती विद्यालय कोजबी, मिनाताई माध्यमिक विद्यालय नवखळा, समाजसेवा विद्यालय वाढोणा, कृषक विद्यालय कोटगाव, समता विद्यालय पाहार्णी आणि धर्मराज विद्यालय नवेगाव पांडव या त्या शाळा असून या शाळांनी आपापल्या शाळेत ९ वी आणि १० वीचे वर्ग सुरू केले आहेत.

The bell rang in nine schools | नऊ शाळांमध्ये वाजली घंटा

नऊ शाळांमध्ये वाजली घंटा

ठळक मुद्देनियम पाळत वर्ग सुरू : तालुक्यातील माध्यमिक शाळा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत तालुक्यात नऊ शाळांमध्ये ९ वी व १० वीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. या शाळांचा धडा घेत आणखी काही शाळा आपल्या शाळेत वर्ग सुरू करतील, असे बोलले जात आहे.
तालुक्यात काही इंग्रजी माध्यमांच्या शाळांसह एकूण ४३ माध्यमिक शाळा आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करावयाच्या की नाही, या विवंचनेत त्या त्या ठिकाणचे शाळा प्रशासन आहे. अशातच तालुक्यातील नऊ आपापल्या शाळेत नववी आणि दहावीचे वर्ग सुरू केले आहे. माध्यमिक विद्यालय गोविंदपूर, अरूणभाऊ झाडे विद्यालय नांदेड, प्रशांत विद्यालय किटाळी, सरस्वती विद्यालय कोजबी, मिनाताई माध्यमिक विद्यालय नवखळा, समाजसेवा विद्यालय वाढोणा, कृषक विद्यालय कोटगाव, समता विद्यालय पाहार्णी आणि धर्मराज विद्यालय नवेगाव पांडव या त्या शाळा असून या शाळांनी आपापल्या शाळेत ९ वी आणि १० वीचे वर्ग सुरू केले आहेत.
या संदर्भात संवर्ग विकास अधिकारी प्रमोद नाट यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही नऊ शाळा नियम पाळत सुरू झाल्याचे सांगितले.

जि.प.शाळा ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांविना
काही माध्यमिक शाळांमध्ये वर्ग सुरू करण्यात आले असले तरी जि.प.च्या प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळा पूर्ण जुलै महिना विद्यार्थ्यांविना राहणार आहेत. १ ऑगस्टपासून सहावी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे निर्देश असल्याने सध्या जि.प.च्या शाळा विद्यार्थ्यांविना आहेत.

Web Title: The bell rang in nine schools