बल्लारपूर क्षेत्रात ३ लाख १९ हजार ९५६ मतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 06:00 AM2019-09-21T06:00:00+5:302019-09-21T06:00:36+5:30

बल्लारपूर मतदार संघात पुरूष मतदार १ लाख ६३ हजार ६७१, महिला १ लाख ५६ हजार २८४ मतदार आहेत. यामध्ये ७८४ दिव्यांग मतदारांचाही समावेश आहे. विधानसभा निवडणुकीसाठी ३६४ मतदार केंद्र व ६ सहाय्यक मतदान केंद्र आहेत. विधानसभा मतदार संघातील ३ लाख १९ हजार ९५६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

In Ballarpur constituency, 5 lakh 19 thousand 19 voters | बल्लारपूर क्षेत्रात ३ लाख १९ हजार ९५६ मतदार

बल्लारपूर क्षेत्रात ३ लाख १९ हजार ९५६ मतदार

Next
ठळक मुद्देनिवडणूक प्रशासन सज्ज : ४ हजार ८५५ नवीन मतदारांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : निवडणूक आयोगाने राबविलेल्या अभियानामुळे बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात क्षेत्रात ३ लाख १९ हजार ९५६ मतदारांची नोंद झाली. आगामी विधासभा निवडणुकीसाठी ४ हजार ८५५ मतदार पहिल्यांदाच मतदारांचा हक्क बजावणार आहे.
बल्लारपूर मतदार संघात पुरूष मतदार १ लाख ६३ हजार ६७१, महिला १ लाख ५६ हजार २८४ मतदार आहेत. यामध्ये ७८४ दिव्यांग मतदारांचाही समावेश आहे. विधानसभा निवडणुकीसाठी ३६४ मतदार केंद्र व ६ सहाय्यक मतदान केंद्र आहेत. विधानसभा मतदार संघातील ३ लाख १९ हजार ९५६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने ईव्हीएम व निवडणूक प्रक्रियेविषयी जागृती केली जात आहे.
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महादेव खेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून आवश्यक कर्मचारी व पोलिसांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

Web Title: In Ballarpur constituency, 5 lakh 19 thousand 19 voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.