शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

राजुरा तालुक्यात बैलजोडी चोरांचा धुमाकूळ

By admin | Updated: February 2, 2016 01:15 IST

शेतकऱ्यांना निसर्गाचा लहरीपणा, शासनाचा बेजबाबदारपणा, सोबतच वेगवेगळ्या संकटांचा सामना करावा लागतो.

शेतकऱ्यांपुढे नवे संकट : महिनाभरात चार बैलजोड्या पळविल्यासास्ती: शेतकऱ्यांना निसर्गाचा लहरीपणा, शासनाचा बेजबाबदारपणा, सोबतच वेगवेगळ्या संकटांचा सामना करावा लागतो. त्यातच एक नवे संकट शेतकऱ्यांपुढे उभे ठाकले आहे. ते म्हणजे त्यांच्या सर्जा-राजाच्या चोरीचे. राजुरा तालुक्यातील भुरकुंडा- भेंदोडा परिसरातील शेतकऱ्यांच्या चांगल्या बैलजोड्या पळविण्याचा सपाटा मागील महिनाभरापासून अज्ञात चोरट्यांनी सुरु केला आहे. परिसरातील चार बैलजोड्या चोरट्यांनी पळविल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.शेतकऱ्यांना विविध संकटाचा सामना करावा लागतो. निसर्गाच्या लहरीपणामुळे त्याला शेत माल उत्पादनात यश येत नाही. आणि आलेच तर शासनाच्या बेजबाबदारपणामुळे त्याला योग्य भाव मिळत नसल्याने आर्थिक नुकसान सोसावे लागते. या सर्व संकटासोबतच राजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांपुढे एक मोठे संकट उभे ठाकले आहे. त्यांच्या जीवाभावाच्या सर्जाराज्याची बैलजोडी चोरट्यांनी पळवून लावण्याचा धुमाकूळ सुरु केला आहे. त्यामुळे संकटात सापडलेला शेतकरी पुन्हा एका नव्या संकटात सापडून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.राजुरा तालुक्यातील भूरकुंडा (बु.) येथील वसंता अनमनवार यांची घरासमोरील गोठ्यात बांधलेली बैलजोडी ३१ डिसेंबरच्या रात्री चोरट्यांनी पळविली. येथील तुकाराम भिकाजी कोटरंगे यांची बैलजोडी १४ जानेवारीला आणि भेंदोडा येथील शेतकरी संतोष पोच्चू गादंगीवार यांचीही घरासमोर बांधलेली बैलजोडी २८ जानेवारीला रात्रीच्या वेळी चोरट्यांनी पळविली. परिसरातील सुकडपल्ली येथील एका शेतकऱ्यांचीसुद्धा बैलजोडी चोरी गेल्याची घटना घडली आहे. शेतकऱ्यांच्या लाखो रुपये किमतीांच्या बैलजोड्या घरासमोरुन चोरीला जात असल्याने शेतकरी चांगलेच दहशतीत सापडले आहेत. या प्रकरणात पोलिसांचे सहकार्य मिळत नसल्यामुळे शेतकरी स्वत:च आपल्या बैलजोडीच्या शोधात फिरत आहेत. परिसरात शोधाशोध करूनही त्यांच्या हाती काहीच लागत नसल्याने व याबाबत कुठलीही मदत मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. (वार्ताहर)शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे पोलिसांचा कानडोळाबैलजोडी चोरी गेल्याची तक्रार करण्याकरिता पोलिसात गेलेल्या शेतकऱ्यांना मात्र योग्य न्याय मिळू शकला नाही. तक्रार देण्यास गेलेल्या शेतकऱ्यांना उलट सुलट प्रश्न विचारुन बैलजोडीचा फोटो आहे का? कुठेतरी गेली असेल बैलजोडी, परत येईलच. असे असमाधानकारक उत्तरे दिली जात आहे.यामुळे शेतकरी हताश होऊन परत जातात. पोलीस काही आपली बैलजोडी शोधून देऊ शकत नाही, ती आपल्यालाच शोधावी लागेल. आपल्याला कुणाचीही मदत मिळत नाही, अशा भावनेने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी आपली बैलजोडी आपणच शोधू असा पवित्रा घेऊन बैलजोडीच्या शोधात महाराष्ट्रासोबतच आंध्रप्रदेशातही शेतकरी गेले असून शोधाशोध सुरू आहे.परिसरातील बैलजोड्या चोरी गेल्या आहेत. ३१ डिसेंबर, १४ जानेवारी व २८ जानेवारी या तारखेला त्या चोरी गेलेल्या आहेत आणि त्या फक्त गुरुवार या दिवशीच चोरीला जात असल्याचे दिसून येत असल्याने जनावरांची चोरी नेमकी विक्री करण्यासाठी होत आहे की त्याची कत्तल करण्याच्या हेतूने होत आहे, हे एक कोडेच आहे. यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून याची प्रशासनाने गंभीर दखल घेणे आवश्यक आहे.- सुधाकर गादंगीवार, शेतकरी भेदोडा