बकुळ धवने ठरली सर्वोत्‍कृष्‍ट अभिनेत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:38 IST2021-02-05T07:38:32+5:302021-02-05T07:38:32+5:30

चंद्रपूर : पुणे येथे आयोजित शांतिदूत महाकरंडक राज्‍यस्‍तरीय एकांकिका स्‍पर्धेत आम्‍ही चंद्रपूरकर या संस्‍थेने सादर केलेल्‍या योगेश सोमणलिखित, डॉ.जयश्री ...

Bakul Dhawan became the best actress | बकुळ धवने ठरली सर्वोत्‍कृष्‍ट अभिनेत्री

बकुळ धवने ठरली सर्वोत्‍कृष्‍ट अभिनेत्री

चंद्रपूर : पुणे येथे आयोजित शांतिदूत महाकरंडक राज्‍यस्‍तरीय एकांकिका स्‍पर्धेत आम्‍ही चंद्रपूरकर या संस्‍थेने सादर केलेल्‍या योगेश सोमणलिखित, डॉ.जयश्री कापसे-गावंडे दिग्‍दर्शित ‘दृष्‍टी‘ या एकांकिकेतील प्रमुख भूमिकेसाठी बकुळ धवने हिने सर्वोत्‍कृष्‍ट अभिनेत्रीचा प्रथम पुरस्‍कार पटकाविला आहे. दि.३१ जानेवारी रोजी पुण्‍याचे महापौर मुरलीधर मोहोळ, माजी विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव, सिनेअभिनेत्री माधवी मोरे आदी मान्‍यवरांच्‍या उपस्थितीत बकुळने हा पुरस्‍कार स्वीकारला.

‘दृष्‍टी’ या एकांकिकेत बकुळने अंध तरुणीची भूमिका साकारली. हिमांशू जोशी हे या एकांकिकेत तिचे सहकारी कलावंत आहे. एकांकिकेची प्रकाश योजना हेमंत गुहे यांनी केली असून, संगीत नियोजन सुशील सहारे यांचे आहे. नेपथ्‍य तेजराज चिकटवार आणि पंकज नवघरे यांचे असून, रंगभूषा आणि वेशभूषा नूतन धवने यांची आहे. या नाटकाचे निर्माते आशिष अंबाडे आहेत.

Web Title: Bakul Dhawan became the best actress