शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

बाबूपेठचा उड्डाण पूल ६१ कोटींच्या अंदाजपत्रकाला

By admin | Updated: November 4, 2015 00:45 IST

चंद्रपुरातील बाबूपेठ येथील रेल्वे रूळावरील बहुप्रतीक्षित उड्डाण पूल उभारण्याची स्थिती अंतीम टप्प्यात आली असली तरी,

नगर विकास मंत्रालयाच्या मान्यतेची प्रतीक्षाचंद्रपूर : चंद्रपुरातील बाबूपेठ येथील रेल्वे रूळावरील बहुप्रतीक्षित उड्डाण पूल उभारण्याची स्थिती अंतीम टप्प्यात आली असली तरी, या पुलाच्या निर्मितीसाठी ६१ कोटी ५७ लाख रूपयांच्या अंदाजपत्रकाला नगर विकास मंत्रालयाच्या प्रशासकीय मान्यतेची प्रतीक्षा मात्र कायमच आहे. ही मान्यता मिळाल्यावरच आणि भूसंपादनाची कार्यवाही झाल्यावरच या पुलाच्या निर्मीतीच्या कार्याला खऱ्या अर्थाने सुरूवात होणार आहे.बाबूपेठच्या उड्डाण पुलाच्या निर्मीतीभोवती शहराच्या विकासाचे राजकारण फिरत असले तरी अद्यापही या पुलासाठी असलेली तांत्रिक बाबींची पूर्तता झालेली नाही, हे तेवढेच स्पष्ट आहे. दस्तुरखुद्द सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक एकच्या कार्यकारी अभियंत्यांनीच एका प्रसिद्धी पत्रकातून ही बाब स्पष्ट केली आहे. चंद्रपूरचे आमदार नाना श्यामकुळे यांच्या मतदार संघात येणाऱ्या बाबूपेठच्या उड्डाण पुलाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून खितपत पडला आहे. त्यामुळे या मार्गाने दररोज ये-जा करणाऱ्या नागरिकांना अकारण प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पुलाच्या मान्यतेतील सर्व अडथळे दूर झाल्याचे आमदार श्यामकुळे यांनी यापूर्वी सांगितले असले तरी, एवढ्या महिन्यानंतरही या पुलाच्या निर्मीतीच्या कामाला न झालेली सुरूवातच सर्व काही सांगून जाण्यास पुरेशी आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने रेल्वे उड्डाण पुलासाठी सर्वसाधारण आराखडा तयार केला आहे. मध्य रेल्वे आणि दक्षिण पूर्व रेल्वे अशा दोन विभागाचे लोहमार्ग रस्त्याला क्रॉस करतात. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या नकाशाला तत्वत: मान्यता दिली असून येथे पादचारीसाठी आणि दुचाकींसाठी तरतुद करण्यासाठी कळविले आहे. त्यानुसार अंडरपासचे नकाशेही मंजुरीसाठी रेल्वेकडे पाठविले आहेत. पोचमार्गासाठी भूमी अभिलेख विभागाकडून मोजणीही झाली आहे. या पुलासाठी राज्य शासनाच्या नगर विकास मंत्रालयाने पाच कोटी रूपये मंजूर केले असून मध्य रेल्वेने २०१५-१६ या रेल्वेच्या अर्थसंकल्पातही या उड्डाण पुलाच्या कामाचा समावेश केला आहे. त्यामुळे या पुलाच्या निर्मीतीच्या आशा बळावल्या आहेत.या संपूर्ण प्रकल्पाच्या कामासाठी ६१ कोटी ५७ लाख रूपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. नगर विकास विभागाकडे ते पाठविण्यात आले आहे. या सोबतच ६९ घरांना या पुलामुळे बाधा पोहचणार आहे. या घरांच्या स्थलांतरणासाठी होणारी भूसंपादनाची प्रक्रियाही अद्याप पूर्ण व्हावयाची आहे. हे काम पूर्ण झाल्यावरच पुलाच्या बांधकामाला सुरूवात होणार आहे. तुर्तास तरी प्रतीक्षाच आहे. (जिल्हा प्रतिनिधी) ६९ कुटुंबीय म्हणतात, उड्डाण पुलाला विरोध नाही‘उड्डाण पुलाचा प्रश्न ऐरणीवर’ या मथळ्याचे वृत्त २ नोव्हेंबरच्या ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच, या उड्डाण पुलाला ६९ कुटुंबियांचा विरोध नसल्याचे पूलबाधित नागरिकांच्या समितीमधील सदस्यांनी एका पत्रकातून स्पष्ट केले आहे. १३ सप्टेंबरला झालेल्या प्रत्यक्ष मोका पहाणीदरम्यान पालमंकत्र्यांनी पूलबाधित नागरिकाचे कसलेही नुकसान होऊ देणार नाही, असे आश्वासन दिल्याने या पुलासाठी आपला विरोध नसल्याचे या सदस्यांनी स्पष्ट केले आहे. या रेल्वे फाटकाचा त्रास जसा नागरिकांना आहे, तसा आपल्यालाही आहे. २० वर्षांपासून ही मागणी शासनदरबारी सातत्याने रेटली जात आहे. आपला विरोध असल्याचे सांगण्यामागे राजकारण असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. उड्डाण पूल लवकर झाला पाहीजे, असा सर्वांचा मानस असल्याचे या पत्रकातून समितीचे सदस्य विजय चांदेकर, स्नेहल रामटेके, प्रितपालसिंग भाटीया, अविनाश शेंडे, जयश्री घडसे, देवानंद बोबडे, केशव दारूंडे, वैशाली कांबळे आदींनी म्हटले आहे.