शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

दगाफटका टाळण्यासाठी ग्रा. पं. च्या सदस्यांना 'सहली'ची मेजवानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:34 IST

घनश्याम नवघडे नागभीड : नागभीड तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर सरपंचपदाच्या दावेदारांनी दगाफटका होऊ नये, यासाठी ...

घनश्याम नवघडे

नागभीड : नागभीड तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर सरपंचपदाच्या दावेदारांनी दगाफटका होऊ नये, यासाठी आपल्या सदस्यांना सहलीवर पाठविल्याची माहिती आहे.

ज्या ठिकाणी सरपंचपद हे सर्वसाधारण आणि नामाप्रसाठी आहे. अशाच ठिकाणी ही खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती आहे.

नागभीड तालुक्यात ५६ ग्रामपंचायती आहेत. यातील ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या ग्रा.पं.चे सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आल्यानंतर काही संवेदनाशील गावांत राजकीय हालचालींना गती आली आहे.

गेली तीन चार वर्षे सरपंचपदाची निवड ही थेट लोकांमधून होत होती. त्यामुळे एकदा निवडणूक पार पडली की, गावातील वातावरण शांत व्हायचे. मात्र, वर्षभरापूर्वी सत्तेवर आलेल्या सरकारने यात बदल करून सरपंच हे पद सदस्यांमधून निवडून देण्याचा कायदा संमत केला. त्यामुळे निवडणूक पार पडल्यानंतर एका गावात अनेक व्यक्ती सरपंचपदाची दावेदारी सांगत असल्याने काही गावात पेच निर्माण होत आहेत.

एवढेच नाहीतर विरोधकांकडून सदस्यांना पदाचे, पैशाचे आमिष दाखविण्यात येत असल्याची माहिती असून या प्रकाराने गावातील गटप्रमुखांची भंबेरी उडत आहे. यातूनच सदस्यांना कोणाच्या संपर्कात न ठेवता बाहेर सहलीवर घेऊन जात असल्याची माहिती आहे.

माहितीनुसार नागभीड तालुक्यातील एका सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीचे १० सदस्य सदस्यपदाचा निकाल लागल्यापासूनच दगाफटका नको म्हणून सहलीवर गेले आहेत. तर पारडी बाळापूर जि.प.क्षेत्रातील एका मोठ्या गावात विरोधकांकडून घुसखोरी होत असल्याची कुणकुण लागताच तेथील गटप्रमुखाने सोबत निवडून आलेल्या सदस्यांना सहलीवर पाठवून दिल्याची माहिती आहे. असेच प्रकार आणखी काही गावातही आहेत. ज्या सर्वसाधारण व जनरल नामाप्रचे आरक्षण आले आहे, अशाच गावात हे प्रकार सुरू असल्याचे एका राजकीय जाणकाराने सांगितले. जेव्हा सरपंच निवडणुकीच्या नोटिसा मिळणे सुरू होतील तेव्हा सहलीचे हे प्रकार आणखी वाढतील, असेही या जाणकाराने सांगितले.

बाॅक्स

नवेगाव पांडवचे आरक्षण

नवेगाव पांडव ग्रामपंचायतीची निवडणूक अडीच वर्षांपूर्वीच पार पडली असली तरी याही ग्रामपंचायतीचे आरक्षण काढण्यात आले आणि ते अनु.जमाती महिलेसाठी निघाले. नवेगाव पांडव येथे अनु.जमातीच्या व्यक्तीचे केवळ एक-दोन घरे असून मतदारही नगण्य आहेत. या आरक्षणाविरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील करणार असल्याची माहिती नागभीड पंचायत समितीचे सदस्य व नवेगाव पांडवचे रहिवासी संतोष रडके यांनी दिली.