शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांचा कल वळविण्यासाठी उमेदवारांकडून शर्तीचे प्रयत्न

By admin | Updated: December 28, 2015 01:31 IST

जानेवारी महिन्याच्या १० तारखेला होणाऱ्या येथील नगरपंचायत निवडणुकीमुळे राजकीय वर्तुळात चांगलेच वातावरण तापले आहे.

गोंडपिपरी: जानेवारी महिन्याच्या १० तारखेला होणाऱ्या येथील नगरपंचायत निवडणुकीमुळे राजकीय वर्तुळात चांगलेच वातावरण तापले आहे. प्रभागातील मतदारांचा कल वळविण्यासाठी काही उमेदवारांकडून मेजवाण्यांसह दररोज प्रभागात जावून नागरिकांची विचारपूस तसेच त्यांचेप्रती सहानुभूती यांचे दर्शन घडत असल्याची माहिती आहे.येथील ग्रामपंचायतील नगरपंचायतीचा दर्जा प्राप्त होताच सर्व नागरिकांचे लक्ष वेधणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला पुढील महिन्याच्या पूर्वाधात पारपडणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीत सत्ता काबिज करण्याच्या उद्देशाने राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. काँग्रेस-भाजपा या बड्या पक्षांचे उमेदवार जरी सर्व प्रभागातून उभे करण्यात आले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना तथा अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेत निवडणूक लढण्याचा चंग बांधून उमेदवारांना उभे केले आहे, तर बड्या पक्षांकडून तिकीट नाकारल्याने या नवडणुकीत रूसवे-फुगवे यातून प्रचंत तिढा निर्माण झाला असून २८ डिसेंबरपर्यंत वरिष्ठांनी या गंभीर बाबींकडे लक्ष न घातल्यास निवडणुकीचे समिकरण वेगळीकडे वळणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळातून कानावर येत आहे.१७ प्रभागांसाठी १०२ उमेदवार आज रिंगणात असून या निवडणुकीत अनेकांची प्रतिष्ठा प्रणाला लागली आहे. अशातच राजकीय वर्तुळातील बड्या पक्षांच्या नेतेमंडळींनी गोंडपिपरी नगरपंचायत निवडणुकीवर विशेष लक्ष देणे सुरु केले असून पक्षांतर्गत बैठका व समिकरणांची जुळवा-जुळवा करणे सुरु केल्याचे दिसून येते.अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपलेल्या नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांचा कल वळविण्यासाठी काही उमेदवारांनी मेजवाण्यांच्या आयोजन करण्यातही आगेकूच केल्याची माहिती आहे, तर प्रशासनाच्यावतीने मतदारांना जनजागृतीपर फलके, रॅली व अन्य माध्यमातून संदेश पोहचविण्याचे कार्य युद्धपातळीवर चालविले आहे. जुन्या- नवीन चेहऱ्यांमध्ये गोंडपिपरी नगरपंचायत निवडणुकीचा महासंग्राम चांगलाच रंगणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. विकासात्मकदृष्ट्या काम करणाऱ्या उमेदवारांना मतदारांचा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या निवडणुकीत केवळ विकास करणाऱ्या उमेदवारांचं चांगभलं होईल, असे दिसत आहे. (तालुका प्रतिनिधी)