चिमूरच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाबाबत नागभीडमध्ये संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:32 IST2021-02-05T07:32:52+5:302021-02-05T07:32:52+5:30

चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून एक नवीन जिल्हा निर्माण करावा, अशी फार जुनी मागणी आहे. ही मागणी प्रशासकीयदृष्ट्या योग्यसुद्धा आहे. ...

Anger in Nagbhid over Chimur's Upper Collector's Office | चिमूरच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाबाबत नागभीडमध्ये संताप

चिमूरच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाबाबत नागभीडमध्ये संताप

चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून एक नवीन जिल्हा निर्माण करावा, अशी फार जुनी मागणी आहे. ही मागणी प्रशासकीयदृष्ट्या योग्यसुद्धा आहे. कारण ब्रह्मपुरी नागभीडपासून मुख्यालय असलेल्या चंद्रपूरचे अंतर १२५ ते १०० कि.मी.च्या घरात आहे. त्यामुळे एखाद्या शासकीय कामासाठी गेलेली एखादी व्यक्ती त्याचदिवशी काम पूर्ण करुन परत आली, असे कधी होत नाही. याच आर्थिक आणि मानसिक त्रासातून मुक्तता व्हावी म्हणून नवीन जिल्ह्याची मागणी अनेकदा होत असते. त्यादृष्टीने चिमूर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय निर्मिती होत आहे. शासनाने यासंदर्भात आक्षेप मागविले आहेत. ही सूचना समाज माध्यमांवर येताच अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. चिमूर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय निर्माण झाल्यास त्यात समाविष्ट तालुक्यांना अतिशय गैरसोयीचे होणार आहे. त्यापेक्षा चंद्रपूरच बरे, चंद्रपूरला जाण्यासाठी रेल्वेसारखा प्रवासाचा स्वस्त आणि दोन तासात पोहचण्याचा पर्याय तरी उपलब्ध आहे, अशी मते नागरिक व्यक्त करीत आहेत. शासनाच्या या आदेशाला विरोध करण्यासाठी येथील अनेक संघटनांनी तयारी चालविली असून या संघटना मुदतीत आक्षेप नोंदविणार आहेत.

Web Title: Anger in Nagbhid over Chimur's Upper Collector's Office