शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी महिलांचा मेळावा

By admin | Updated: May 7, 2015 01:00 IST

अंगणवाडी महिलांचा मेळावा कुंदा वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली सिंदेवाही येथे घेण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. रमेशचंद्र दहिवडे उपस्थित होते.

सिंदेवाही : अंगणवाडी महिलांचा मेळावा कुंदा वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली सिंदेवाही येथे घेण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. रमेशचंद्र दहिवडे उपस्थित होते. प्रास्ताविक भाषणात वर्षा कोंडेकर म्हणाल्या, गेल्या चार महिन्यांपासून अंगणवाडी सेविकांना केंद्र शासनाचे तसेच राज्य शासनाचे मानधन मिळाले नाही. सेविकेने जगायचे तर कसे जगायचे असा भीषण प्रश्न पुढे उभा ठाकला आहे. जिल्हा परिषदेवर जाऊन असंतोष व्यक्त करायचा तर पैशाअभावी अंगणवाडी सेविका तेदेखील करु शकत नाही. ही वस्तुस्थिती असताना शासनाला वाटते की सर्वकाही व्यवस्थित चालले आहे. प्रा. रमेशचंद्र दहिवडे म्हणाले, गरीबांना जगण्याचा अधिकार नाही, असा दृष्टिकोन बाळगणाऱ्यांच्या हातात देशाची सत्ता आली आहे. अंगणवाडी महिलांना केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या वतीने मानधन दिले जाते. मात्र दोघांनीही चार महिन्यांपासून यातून अंग काढले आहे. अंगणवाडी महिलांना १ एप्रिल २०१४ पासून मानधन वाढ देण्याच्या उद्देशाने राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सह्याद्रीवर बैठक बोलाविली होती. सर्वच अंगणवाडी संघटनेच्या प्रतिनिधींनाही निमंत्रित केले होते.मात्र बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे गैरहजर असल्याने निर्णय होऊ शकला नाही. त्यानंतर १५ एप्रिलला पुन्हा अर्थमंत्र्यांनी सह्याद्रीवर बैठक बोलाविली त्याही बैठकीला पंकजा मुंडेंनी याकडे लक्ष दिले नाही. महाराष्ट्र शासनाने याची गंभीरपणे दखल घ्यावी. राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविका तसेच मदतनिसांच्या जीवनाशी खेळणाऱ्या बालकल्याणमंत्री यांची पदावरुन हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे राज्यध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनी केली. अंजिरा कोलते यांच्या आभार प्रदर्शनाने मेळाव्याचा समारोप झाला. यावेळी लता जनबंधू, शालिनी धर्मपुरीवार, रुपाली हटकर, सविता मगरे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)