चिमूरमध्ये एड्स मुक्ती प्रतिज्ञा वाचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:56 IST2020-12-04T04:56:16+5:302020-12-04T04:56:16+5:30

फोच चिमूर : राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जागतिक एड्स दिनानिमित्य एकात्मिक सल्ला व तपासणी केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, चिमूर ...

AIDS Freedom Pledge Reading in Chimur | चिमूरमध्ये एड्स मुक्ती प्रतिज्ञा वाचन

चिमूरमध्ये एड्स मुक्ती प्रतिज्ञा वाचन

फोच

चिमूर : राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जागतिक एड्स दिनानिमित्य एकात्मिक सल्ला व तपासणी केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, चिमूर व संकल्प बहुउद्देशिय ग्राम विकास संस्था द्वारा संचालित लिंक वर्कर प्रकल्प, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने उपजिल्हा रुग्णालय, चिमूर येथे एड्स मुक्ती प्रतिज्ञा वाचन करून उपस्थित सर्वांना शपथ देण्यात आली.

अध्यक्षस्थानी वैदयकीय अधिक्षक डॉ. जी. डब्ल्यू. भगत होेते. यावेळी त्यांनी उपस्थितांनी मार्गदर्शनात एच.आय.व्ही.,एडसबाबत असणारे गैरसमज दूर करून प्रतिबंधात्मक उपायांबाबत माहिती दिली. प्रत्येकांनी आपली तपासणी करून घेण्याचे आवाहन केले. आयसीटीसी समुपदेशक कामिनी हलमारे यांनी प्रतिज्ञा वाचन करून एड्स मुक्तीची चळवळ युवकांनी सुरू करण्याबाबत मार्गदर्शन केले. आयसीटीसी व संकल्प संस्थे अंतर्गत पोष्टर प्रदर्शनी लावून व एचआयव्हीएड्स विषयक माहिती पत्रकाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला लिंक वर्कर माधव बांडेबूचे, ज्योती पोपटे व रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.

Web Title: AIDS Freedom Pledge Reading in Chimur