शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यानंतरही आदिवासींच्या जीवनात अंधार

By admin | Updated: May 23, 2015 01:31 IST

आदिवासी बांधवाचे जीवनमान उंचाविण्यासाठी शासन व प्रशासनाकडून विविध योजना राबविल्या जातात.

जिवती: आदिवासी बांधवाचे जीवनमान उंचाविण्यासाठी शासन व प्रशासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. प्रत्यक्ष त्या योजनेचा फायदा कितपत त्या आदिवासी बांधवाना होतो, याचा प्रत्यय आता पहाडावरील आदिवासी गाव-गुडे पाहिल्यानंतर येतो. जीवती तालुक्यातील १२ घरांची वस्ती असलेल्या जीवती तालुक्यातील लखमापूर (येरवा) या आदिवासी गुड्ड्याला प्रस्तुत प्रतिनिधीने भेट दिली असता, तेथील भयाण वास्तव्य समोर आले. वीज, आरोग्य, रस्ते, पाण्याबरोबरच विजेचा प्रकाशही गावात पोहोचला नाही. स्वातंत्र्याच्या अनेक वर्षानंतरही या आदिवासी बांधवाना अंधारात जीवन जगावे लागत आहे.डोंगराच्या कुशीत असलेल्या लखमापूर (येरवा) गावात १२ घरांची वस्ती आहे. ७० च्या जवळपास येथील लोकसंख्या असून प्रत्येक गावगुड्यातील नागरिकांना सोयी- सुविधा मिळणे आवश्यक असताना बंधनकारक असली तरी लखमापूर (येरवा) विविध विविध कायमच्या चिटकून बसल्या आहेत. गावात जायला योग्य रस्ता नाही. महामंडळाची बस गावात जात नाही, दूरध्वनी सेवाही नाममात्र आहे. पिण्याच्या पाण्यासाठी तर गावकऱ्यांचे हाल होत आहेत. आरोग्याची काळजी घेणारे कर्मचारी कर्तव्यापुरते गावात येतात. गाव विकासाची महत्वाची धुरा सांभाळणारा ग्रामसेवकही गावात येत नसल्याचे गावकरी सांगतात. गृहकर वसुलीसाठी चपऱ्याशाला गावात पाठविले जात असल्याची माहितीही येथील नागरिकांनी दिली. आदिवासी बांधवाना विजेची सोय व्हावी, यासाठी गावकरी व शाळकरी मुलांनी विद्युत विभाग कार्यालय, बल्लारपूर, जीवती, तसेच या क्षेत्राचे आमदार संजय धोटे, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना अनेकवेळा निवेदने देण्यात आलीत. मात्र त्या निवेदनावर आजपर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही. २०११ मध्ये गावात विजेचे खांब आले. तारही टाकण्यात आलेत.मात्र अद्यापही वीज जोडण्या करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्यात; पण संबंधित विभागाच्या दिरंगाईमुळे या आदिवासी बांधवाना अंधाराचा सामना करावा लागत आहे. विकासाच्या घोषणा देत सभा गाजविणाऱ्या नेत्यांनी प्रत्यक्ष गावात जावून जनतेच्या समस्या जाणून समस्या सोडविण्याची मागणी आनंदराव कोटनाके चिन्नु, कोटनाके,रघुनाथ कोटनाके आदींनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)