शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

घरकामासह ‘त्या’ देतात प्रशासकीय सेवा

By admin | Updated: March 13, 2016 00:57 IST

देशात पुरुषप्रधान संस्कृती असल्याने महिलांकडे चूल आणि मूल सांभाळणारी एक सेविका अशाच भावनेने आजही समाज पाहतो.

६२ महिला सांभाळतात गावाचा कारभार : २३ महिला बनल्या गावच्या ‘पाटलीण’राजकुमार चुनारकर खडसंगीदेशात पुरुषप्रधान संस्कृती असल्याने महिलांकडे चूल आणि मूल सांभाळणारी एक सेविका अशाच भावनेने आजही समाज पाहतो. मात्र बदलत्या काळानुसार पुरूषप्रधान संकल्पनेवर मात देत महिला आता प्रत्येक क्षेत्रात अग्रणी आहेत हे दिसून येते. चिमूर तालुक्यात ६२ महिला गावाचा कारभार सांभाळत राजकारणात आहेत, तर हजारो महिला शासनाच्या विविध विभागात घरकामासह प्रशासकीय सेवा देत आहेत.पुरातन काळात स्त्रियांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात येत होते. स्त्रियांना एक भोगवस्तू म्हणूनच पाहिल्या जात होते. मात्र इंग्रज राजवटीत महात्मा फुले, सावित्रीबाई फुले तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानिक अधिकार देऊन महिलांचा सन्मान वाढविला. आजच्या घडीला महिला प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असल्या तरी पुरुषांपेक्षा त्यांचे प्रमाण कमी आहे.महिलांना राजकारणासह प्रशासकीय नोकरीमध्ये आरक्षण असल्याने अनेक महिला विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. मात्र पुरुषी मानसिकतेमुळे मोठ्या प्रमाणात आजही महिला चुल आणि मुल सांभाळण्यातच धन्यता मानत आहेत. पंचायत राज व्यवस्थेत तत्कालीन काँग्रेस सरकारने महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत ५० टक्के आरक्षण दिल्याने अनेक महिला जिल्हा, तालुक्यासह गावाचा कारभार सांभाळण्यासाठी सत्तेमध्ये सहभागी झाल्या आहेत. चिमूर शहरासह तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतीचा कारभार महिला सांभाळत आहेत, तर जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषदेसह ६२ महिला राजकारणात कार्य करित आहेत.भारताच्या संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे प्रधानमंत्री, राष्ट्रीय या मोठ्या पदासह अंतराळातही महिलांनी भरारी घेतली आहे. देशाच्या राजकारणासह गावाच्या कारभारापर्यंत सहभागी झाल्या आहेत. एकेकाळी महिलांना पडद्याच्या मागे राहावे लागत होते. मात्र आता अनेक महिला गावाच्या कारभारासह गावातील न्यायनिवाडे करण्यातही आपला सहभाग देत आहेत. त्यामुळे महिलांचा राजकारणासह प्रशासनातही सहभाग वाढल्याने आजची नारी अबला नसुन सबला झाल्याची प्रचिती या महिलाच्या सहभागावरून दिसत आहे. तेव्हा महिलाही पुरुषांपेक्षा कोणत्याच क्षेत्रात मागे नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. चिमूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १६१ शाळामध्ये १६१ शिक्षिका कार्यरत आहेत तर तीन महिला केंद्र प्रमुख म्हणून कार्यरत आहेत तर आरोग्य विभागात १९४ आशावर्कर, ३१ परिचारिका, ६ सुपरवायजर, १८ कंत्राटी अशा २५९ महिला तालुक्यातील नागरिकांना आरोग्यसेवा देत आहेत. तसेच राज्य परिवहन महामंडळामध्ये १९ वाहक, ६ यांत्रिकी अशा २५ महिला हातात मशीन व पाने पेंचिस घेऊन कार्यरत आहेत. तसेच ५ महिला तालुक्याच्या सुरक्षा व्यवस्थेतही सहभागी झाल्या आहेत. तसेच समाजाचे लहान मूल घडवण्याकरिता २७७ अंगणवाडीतून एकात्मिक बाल विकास प्रकल्पातर्फे ५७४ महिला सेवा देत आहेत. अशाप्रकारे १०३८ महिला राजकारणासह प्रशासनाच्या सेवेतही चूल आणि मूल सांभाळत आपली सेवा देत आहेत. तालुक्यात झालेल्या पोलीस पाटील भरतीमध्ये २३ महिला गावाच्या ‘पाटलीण’ बनल्या आहेत. त्यामुळे घरकामासह महिला आजघडीला प्रशासकीय सेवेतही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करित आहेत.