शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

कापसाचा पीक विम्यात समावेश करा

By admin | Updated: June 14, 2017 00:24 IST

बल्लारपूर तालुक्यात खरीप हंगामाचे एकूण नऊ हजार ३७९ हेक्टर क्षेत्र निर्धारित करण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : बल्लारपूर तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यात खरीप हंगामाचे एकूण नऊ हजार ३७९ हेक्टर क्षेत्र निर्धारित करण्यात आले आहे. त्यातील ६ हजार ७६५ हेक्टर क्षेत्रात प्रत्यक्ष खरीप हंगामाची लागवड केली जाते. गेल्या वर्षी सर्वाधिक ३ हजार ११५.८० हेक्टर क्षेत्रात ‘कापूस’ पीक घेतले होते. मात्र शासनाने पीकविमा योजनेतून ‘कापूस’ हद्दपार केला आला आहे. ‘कापूस’ पीक विमा योजनेत समावेश करा, या मागणीला अनुसरुन बल्लारपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.तालुक्यातील नांदगाव (पोडे), हडस्ती, चारपट, विसापूर, बामणी (दुधोली), दहेली, कळमना, कोर्टिमक्ता, पळसगाव, आमडी, कोठारी व किन्ही गावातील शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील प्रमुख पीक ‘कापूस’ हेच आहे. याच पिकांवर शेतकऱ्यांचा आर्थिक डोलारा उभा असून बल्लारपूर तालुक्यातच ‘कापूस’ पिकाला पीकविमा योजनेतून वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. बल्लारपूर तालुक्याचा समावेश ‘कापूस’ पीकविमा योजनेत करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी बल्लारपूर पंचायत समितीचे सभापती गोविंदा पोडे, भाजपाचे तालुका अध्यक्ष किशोर पंदीलवार व जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. हरीश गेडाम यांनी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी कल्पना नीळ-ठुबे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.मागील दशकापासून बल्लारपूर तालुक्यातील शेतकरी कापूस मुख्य पीक म्हणून उत्पादन घेत आहेत. तरीही या पिकाच्या पीकविमा योजनेतून तालुका वगळण्यात आला. त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही कृती करून शेतकऱ्यांवर अन्याय करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामातील पीक पेऱ्याच्या अहवालानुसार, कापूस ३ हजार ११५.८० हेक्टर क्षेत्र आणि भात पिकाचे २ हजार ९०९.६० हेक्टर क्षेत्र होते. तूर ३७३.३० हेक्टर आणि सोयाबिनचा पेरा घटून ३३३.१० हेक्टर क्षेत्रात होता. बल्लारपूर तालुक्यात सर्वाधिक पेरणीचे क्षेत्र कापसाचे असताना पीकविमा योजनेतून बाद ठरविण्यात आले.त्यावर शासनाने त्वरित निर्णय घेवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्याकडे करण्यात आली आहे. तसेच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निर्णय घेण्यासंदर्भात प्रत्यक्ष भेट घेवून शेतकऱ्यांची बाजू समजावून सांगण्यात आली.