शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

वेकोलीचे लालपेठ व घुग्‍घुस येथील राजीव रतन हॉस्‍पिटल कोविड रुग्‍णांसाठी अधिग्रहित करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:26 IST

चंद्रपूर : जिल्‍ह्यात कोरोना रुग्‍णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मृत्‍यूदर लक्षात घेता वेस्‍टर्न कोलफिल्‍डस़ लिमी. चे चंद्रपूर शहरातील ...

चंद्रपूर : जिल्‍ह्यात कोरोना रुग्‍णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मृत्‍यूदर लक्षात घेता वेस्‍टर्न कोलफिल्‍डस़ लिमी. चे चंद्रपूर शहरातील लालपेठ परिसरातील हॉस्‍पिटल व घुग्‍घुस येथील राजीव रतन हॉस्‍पिटल जिल्‍हा प्रशासनाने कोविड रुग्‍णांसाठी अधिग्रहित करावे तसेच १०० बेडचे महिला रुग्‍णालयसुध्‍दा तातडीने कोविड रुग्‍णांसाठी उपलब्‍ध करावे, अशी मागणी विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. यासंदर्भात जिल्‍हाधिकारी अजय गुल्‍हाने आणि वेकोलीचे सीएमडी मनोजकुमार यांच्‍याशी त्यांची चर्चा झाली असून त्‍यांनी सकारात्‍मक कार्यवाहीचे आश्‍वासन दिले आहे.

खासगी रुग्‍णांलयामध्‍येसुध्‍दा बेडस् उपलब्‍ध होत नाहीत. त्‍यामुळे रुग्‍ण व त्‍यांचे नातेवाईक चिंताग्रस्‍त आहे. तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी, आरोग्‍य कर्मचाऱ्यांची रिक्‍त पदेही चिंतेची बाब आहे. ऑक्‍सिजन बेडस्, व्‍हेंटिलेटर बेडस्सुध्‍दा उपलब्‍ध नाहीत. अशा परिस्थितीवर तोडगा काढण्‍याच्‍या दृष्‍टीने वेकोलीचे चंद्रपूर शहरातील लालपेठ परिसरातील हॉस्‍पिटल व घुग्‍घुस येथील राजीव रतन हॉस्‍पिटल जिल्‍हा प्रशासनाने कोविड रुग्‍णांसाठी अधिग्रहित करत उपलब्‍ध केल्‍यास यासंदर्भात मोठी उपाययोजना ठरेल, असे आ. मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्‍णालय येथील १०० बेडेचे म‍हिला रुग्‍णालयाचे नुकतेच उद्घाटन होवूनही सदर रुग्‍णालय कोविड रुग्‍णांसाठी उपलब्‍ध झाले नाही. वर्षभरापुर्वी कोरोना संक्रमण सुरू झाल्‍यापासुन या विषयाचा पाठपुरावा करीत आहे. ही बाब सार्वजनिक आरोग्‍यमंत्र्यांच्‍या आपण निदर्शनास आणून दिल्याचेही त्यांनी सांगितले. सदर विषयाकडे होणारे दुर्लक्ष चिंताजनक आहे. महिला रुग्‍णालयसुध्‍दा तातडीने कोविड रुग्‍णांसाठी उपलब्‍ध करण्‍याची मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्‍हा प्रशासनाकडे केली आहे.