पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. राजेंद्र प्रसाद वॉर्ड येथील आरोपी प्रदीप ऊर्फ शेट्टी श्रीनिवास रेगुंडवार यास चंद्रपूर न्यायालयाने कलम ३०२,३०७,३२४,३४ भादंवि या गुन्ह्यात १२ एप्रिल २०१६ शिक्षा सुनावली. आरोपी मध्यवर्ती कारागृह नागपूर येथे जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना त्याला ३१ जुलै २०२० ला २८ दिवसाच्या संचित रजेवर सोडण्यात आले. परंतु त्यानंतर तो कारागृहात हजर न होता अनधिकृतपणे संचित रजेवरून फरार झाला. घटनेची तक्रार कारागृहाचे वीरेंद्र श्रीरामे यांनी बल्लारपूर ठाण्यात दिल्यानंतर आरोपीवर कलम २२४ भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करून ५ फेब्रुवारीला रात्री पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी सहायक पोलीस निरीक्षक विकास गायकवाड, सतीश पाटील,शरद कुडे,चालक रतन पेंदाम यांच्यासह सापळा रचून आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास हवालदार शिवराज वाघमारे करीत आहे.
नागपूर कारागृहातून रजेवर आलेल्या आरोपीला बल्लारपुरात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:26 IST
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. राजेंद्र प्रसाद वॉर्ड येथील आरोपी प्रदीप ऊर्फ शेट्टी श्रीनिवास रेगुंडवार यास चंद्रपूर न्यायालयाने कलम ३०२,३०७,३२४,३४ ...
नागपूर कारागृहातून रजेवर आलेल्या आरोपीला बल्लारपुरात अटक
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}