भाविकांच्या वाहनाला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2016 01:15 IST2016-03-12T01:15:58+5:302016-03-12T01:15:58+5:30

भद्रावती तालुक्यातील टेकाडीे येथील भाविक चिमूर तालुक्यातील ‘मुक्ताबाई’ (डोमा) येथे नवसाचा स्वयंपाक करण्याकरिता मिनीडोअरने जात असताना ...

Accident of the devotees' vehicle | भाविकांच्या वाहनाला अपघात

भाविकांच्या वाहनाला अपघात

२२ जखमी : चिमूर-शेडेगाव येथील घटना
खडसंगी : भद्रावती तालुक्यातील टेकाडीे येथील भाविक चिमूर तालुक्यातील ‘मुक्ताबाई’ (डोमा) येथे नवसाचा स्वयंपाक करण्याकरिता मिनीडोअरने जात असताना चिमूर- वरोरा मार्गावरील शेडेगाव (कॅम्प) जवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या बाजूला जाऊन खड्डयात उलटल्याने २२ भाविक जखमी झाले. जखमींना चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर घटना सकाळी १२ वाजता दरम्यान घडली.
भद्रावती तालुक्यातील टेकाडी येथील दशरथ दडमल यांचा नवसाचा स्वयंपाक मुक्ताबाई (डोमा) येथे शुक्रवारी होता. या स्वयंपाकाकरिता गावातील नातेवाईकांसह २९ भाविकांना घेऊन एम.एच.३४ एबी- ३५८८ हा मालवाहू मिनीडोअर डोमा येथे निघाला. मात्र शेडेगाव कॅम्पजवळ वाहकाने नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्यालगतच्या खड्ड्यात उलटले. यामध्ये २२ भाविक जखमी झाले. जखमीमध्ये शालिक कन्नाके, पत्रुजी कोयचाडे, गजानन शेडाम, शांताबाई दडमल, काशिनाथ कन्नाके, निर्मला बावणे, कु.मंगला दडमल, सरस्वती दडमल, प्रभाकर मगरे, लक्ष्मीकांता जांभुळे, कमल चौखे हे जखमी चिमूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत तर गंभीर जखमींपैकी प्रमिला मोंढे, शोभा शेरकुरे, शशिकला श्रीरामे यांना नागपूर येथे उपचाराकरिता रवाना करण्यात आले. चिमूर पोलिसांनी चालक विनोद भास्कर झाडे याला अटक केली आहे. पुढील तपास ए.एस.आय. माकोडे करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Accident of the devotees' vehicle