शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामांना गती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 06:00 IST

मनपा स्तरावर राबविल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजनांची आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. महानगरपालिका हद्दीमधे आजपर्यंत घटक ०४ अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधण्यास अनुदान अंतर्गत प्राप्त अर्जांपैकी १हजार ५९ अर्ज प्रात्र ठरले यापैकी ३०४ घरकुल बांधकाम सुरू आहे.

ठळक मुद्देअंजली घोटेकर : चंद्रपूर शहरात ३०४ घरकूल बांधकाम सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्र्रपूर : महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत सन २०२२ पर्यंत सर्वांना घरे योजनेतून शहरात ३०४ घरकूल बांधकाम सुरू आहेत. अधिकाऱ्यांनी या योजनेला गती द्यावे, असे निर्देश महापौर अंजली घोटेकर यांनी दिले.मनपा स्तरावर राबविल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजनांची आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. महानगरपालिका हद्दीमधे आजपर्यंत घटक ०४ अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधण्यास अनुदान अंतर्गत प्राप्त अर्जांपैकी १हजार ५९ अर्ज प्रात्र ठरले यापैकी ३०४ घरकुल बांधकाम सुरू आहे. उरलेल्या अर्जांच्या पडताळणीनंतर मालकी हक्काची कागदपत्रे, जमिनीचा स्थळदर्शक नकाशा, कर पावती, स्टॅम्प पेपर आदी आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी अर्जधारकांना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. ‘सर्वांसाठी घरे २०२२’ या संकल्पनेतून प्रत्येक कुटुंबाला पक्के घर असायला हवे, यासाठी केंद्र शासनाकडून महत्त्वाकांक्षी अशी प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आली आहे.या योजनला गती देण्याच्या दृष्टीने चंद्र्रपूर महानगर पालिकेतर्फे कागदपत्रांची पूर्तता केल्या जात आहे. त्यासाठी अर्जदारांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन पालिका कर्मचाऱ्यांनी यापूर्वी काम केल्याची माहिती महापौर घोटेकर यांनी दिली. यावेळी उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी समिती सभापती राहुल पावडे, गटनेता वसंत देशमुख, उपायुक्त गजानन बोकडे, शहर अभियंता महेश बारई, उपअभियंता विजय बोरीकर व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.अडीच लाखांचे मिळणार अनुदानशासनातर्फे मंजूर योजनांचा लाभ गरजू नागरिकांना मिळावा, यासाठी चंद्रपूर महानगर पालिकेतर्फे अनेकदा कार्यशाळेचेही आयोजन करण्यात आले होते. या योजनेतंर्गत घरकुलसाठी केंद्र शासनाकडून १ लाख ५० रूपये आणि राज्य शासनाकडून १ लाख असे एकून २ लाख ५० हजार रूपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. त्यामुळे शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी ही योजना फायदेशीर ठरणार आहे. घरकुलसाठी नकाशा काढणे तसेच बांधकाम मंजुरीसाठी कुठलाही खर्च लाभार्थ्यांना करण्याची गरज नाही. लाभार्थ्यांना संपूर्ण सुविधा पालिकेतर्फे पुरविण्यात येणार आहे. घरकूल बांधकामाच्या चार टप्यानुसार पाया, स्लॅब लेव्हल, स्लॅब पूर्ण व घर फिनिशिंगचे निरीक्षण करून त्यानुसार अनुदान देण्यात येणार आहे.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना