शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ९४ उमेदवार; जाणून घ्या उमेदवारांना 'डिपॉझिट' वाचविण्यासाठी किती मते हवी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 12:13 IST

एकूण मतदानाच्या एकषष्ठांश मते आवश्यक : प्रचारात आली रंगत

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघांत एकूण ९४ उमेदवार रिंगणात असून, डिपॉझिट (अनामत रक्कम) वाचविण्यासाठी प्रत्यक्ष झालेल्या एकूण वैध मतदानाच्या एकषष्ठांश मते मिळविणे आवश्यक आहे. निवडणूक प्रचारादरम्यान अनेक उमेदवारांकडून प्रतिस्पर्धी उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करू, अशी गर्जना केली जाते. डिपॉझिट जप्त म्हणजे, नामुष्कीजनक पराभव मानला जातो. एकूण वैध मतांच्या एकषष्ठांशही (१६.६६ टक्के) मते जे मिळवू शकत नाहीत, त्यांचे डिपॉझिट जप्त होते. 

राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. जिल्ह्यात वरोरा, चंद्रपूर, राजुरा, बल्लारपूर, चिमूर, ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात निवडणूक होणार आहे. या सर्व मतदारसंघांत प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजप, काँग्रेससह अन्य पक्षांचे तसेच अपक्ष उमेदवारही निवडणूक रिंगणात आहे. काही विधानसभा क्षेत्रात दिग्गज उमेदवार तर काही ठिकाणी नवखे चेहरे निवडणूक रिंगणात आहे. 

अनेकांना मोह आवरेना.... 

  • लोकशाहीत कोणीही निवडणूक लढवू शकतो. पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही तर अनेकजण अपक्ष म्हणून निवडणूक लढवितात. आपल्यामुळे पुढील उमेदवार अडचणीत सापडेल, अशी गर्जनाही अनेकवेळा उमेदवार करतात.
  • यापूर्वी विधानसभा निवडणुकीत अनेकांची अनामत रक्कम जप्त झालेली आहे. काही जणांना निवडणूक लढविण्याचा मोह आवरत नाही. आपण निवडून येऊ या आशेवर ते निवडणूक लढवतात.

कोणाला किती 'डिपॉझिट'?सर्वसाधारण गटातील उमेदवारांना डिपॉझिट म्हणून दहा हजार रुपये तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना पाच हजार रुपये भरावे लागतात. एकूण वैध मतांच्या एकषष्ठां- शापेक्षा कमी मते मिळाल्यास अनामत रक्कम परत मिळत नाही, एकूण वैध मतांच्या एक षष्ठांशापेक्षा जास्त मते मिळाली तर अनामत रक्कम परत केली जाते.

कोणत्या मतदारसंघात किती उमेदवार?चंद्रपूर - १६राजुरा - १४ बल्लारपूर - २० चिमूर - १३ ब्रह्मपुरी - १३वरोरा - १८

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४chandrapur-acचंद्रपूर