शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यात एचआयव्हीचे एका वर्षात ६६२ रुग्ण

By admin | Updated: May 18, 2015 01:08 IST

मागील काही वर्षांपासून एचआयव्ही होऊ नये म्हणून पुरुष व महिलांनी काळजी घ्यावी, यासाठी राष्ट्रीयस्तरावर एचआयव्ही निर्मूलन कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे.

वरोरा : मागील काही वर्षांपासून एचआयव्ही होऊ नये म्हणून पुरुष व महिलांनी काळजी घ्यावी, यासाठी राष्ट्रीयस्तरावर एचआयव्ही निर्मूलन कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. असे असतानाही चंद्रपूर जिल्ह्यात मागील एका वर्षांत ६३२ एचआयव्ही रुग्ण तपासणीमध्ये आढळून आले आहेत. मागील काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी रुग्णांची संख्या कमी असल्याचे मानले जात आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात एचआयव्हीच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. त्यामुळे मागील काही वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यात एचआयव्ही निर्मूलनासाठी शासनाकडून सामाजिक संघटनांच्या वतीने मोठ्या प्रमाणात जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. तसेच तालुका व ग्रामीणस्तरावरही शासकीय रुग्णालयांत तपासणी केंद्र तसेच औषधी उपचार व मार्गदर्शन केंद्राची स्थापना करण्यात आली. गरोदर स्त्रीयांना एचआयव्ही तपासणी सक्तीची करण्यात आली आहे. अशा चंद्रपूर जिल्ह्यातील या वर्षात ५१ हजार ८७२ स्त्री व पुरुषांची तपासणी करण्यात आली. त्यात ६३२ रुग्ण आढळून आले आहेत. यातील ६२८ रुग्णांनी औषधोपचारासाठी नोंदणी केली आहे. नियमीत औषधोपचार घेतल्यास या आजाराची तीव्रता कमी होते, याबाबत रुग्णांमध्ये औषधी उपचारासोबतच जनजागृती व मार्गदर्शन विविध केंद्रावरुन करण्यात येते. शासकीय रुग्णालयात चंद्रपूर जिल्ह्यात ४२ हजार २७८ गरोदर मातांची तपासणी करण्यात आली. त्यात ४४ माता बाधित असल्याचे आढळून आले आहे. गरोदर माता एचआयव्हीने बाधित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतरही शासकीय रुग्णालयात या मातांची प्रसूती केली जात आहे. त्यामुळे अनेक गरोदर माता उपचारासाठी तसेच प्रसूतीकरिता शासकीय रुग्णालयात दाखल होत आहेत. (तालुका प्रतिनिधी)मातापिता एचआयव्ही परंतु बालके नाहीमागील काही वर्षांत माता व पित्याला एचआयव्ही असेल तर त्यांना जन्माला आलेल्या बालकांनाही एचआयव्हीची बाधा होत असे. परंतु प्रसुती अगोदरच्या तपासणीत माता व पित्याला एचआयव्ही असल्यास त्यांच्यावर औषधी उपचार करण्यात येत असल्याने अशा दाम्पत्याच्या मुलाला एचआयव्हीची बाधा होण्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे.एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्हमध्ये पाठपती किंवा पत्नीला एचआयव्हीची बाधा झाली असेल तर काही दिवसात दोघांनाही त्याची बाधा झाल्याचे आढळून येत होते. परंतु सध्या स्त्री व पुरुषांची तपासणी वेळीच करण्यात येते. यामध्ये एकाला बाधा असल्यास त्यांना काळजी घेण्याबाबतचे मार्गदर्शन करण्यात येत असल्याने सध्या पती व पत्नीमध्ये एकच पॉझिटिव्ह असण्याचे प्रमाण वाढले आहे.जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यात येत असून सामाजिक संघटनाही एचआयव्ही मुक्त करण्याकरिता चांगले कार्य करीत आहे. तसेच शहरी व ग्रामीण भागात विविध ठिकाणी तपासणी केंद्र औषध उपचार व मार्गदर्शन केंद्र उभारल्याने नागरिकांमध्ये जागृती चांगली झाल्याने दिवसागणिक एचआयव्ही बाधितांची संख्या कमी होत आहे.- सुमन पनगंटीवार, कार्यक्रम अधिकारी