चंद्रपूर परिमंडळात ६११ कोटी ११ लाखांचे वीज देयक थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:26 AM2021-01-21T04:26:26+5:302021-01-21T04:26:26+5:30

चंद्रपूर महावितरण परिमंडळातील घरगुती ग्राहकांकडे थकबाकी ११५ कोटी २६ लाखांच्या घरात पोहोचली आहे. वाणिज्यिक ग्राहक १७ कोटी ...

611 crore 11 lakh electricity bill arrears in Chandrapur circle | चंद्रपूर परिमंडळात ६११ कोटी ११ लाखांचे वीज देयक थकीत

चंद्रपूर परिमंडळात ६११ कोटी ११ लाखांचे वीज देयक थकीत

Next

चंद्रपूर महावितरण परिमंडळातील घरगुती ग्राहकांकडे थकबाकी ११५ कोटी २६ लाखांच्या घरात पोहोचली आहे. वाणिज्यिक ग्राहक १७ कोटी ३६ लाख व औद्योगिक ग्राहकांकडे ४ कोटी ५१ लाख २ हजारांची थकबाकी आहे. याशिवाय पाणीपुरवठा योजनांकडे ३ कोटी एक लाख, तर सरकारी कार्यालयाकडे ४ कोटी ८७ लाख थकबाकी आहे. कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित ग्राहकांकडे ३६ कोटी ४३ लाख तसेच कृषिपंपधारकांकडे २१९ कोटी ५४ लाखांची थकबाकी आहे. त्यामुळे सर्वच थकबाकीदारांविरोधात कारवाई करण्याची तयारी महावितरणने केली आहे.

कारवाईसाठी सात पथक गठित

चंद्रपूर परिमंडळात कारवाई मोहिमेची अंमलबजावणी करण्यासाठी सात पथके गठित करण्यात आली आहेत. महावितरणच्या अस्तित्वासाठी ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक युनिटची वसुली अत्यावश्यक आहे. सध्या महावितरण आर्थिक बिकट परिस्थितीला सामोरे जात आहे. थकबाकी वसुलीशिवाय पर्याय नसल्याने कारवाई सुरू झाली. याचाच भाग म्हणून थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश महावितरणने बुधवारी जारी केले आहे.

वीजदेयक सुलभ हप्त्यात भरण्याची मुभा

लॉकडाऊनच्या काळात थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणने निर्णय घेतला होता. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा डिसेंबर अखेरपर्यंत खंडित न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. थकबाकीदार ग्राहकांना वीजबिल सुलभ हप्त्यामध्ये भरण्याची सवलत महावितरणने दिली. सोबतच थकबाकीवर विलंब आकार न लावण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्राहकांच्या वीजबिलासंबंधी तक्रारी असल्यास तात्काळ सोडविण्यासाठी पथक सज्ज आहेत, असा दावा महावितरणने केला आहे.

कोट

महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. जर ग्राहकांनी वीजबिल भरले नाही तर वीजपुरवठा खंडित करण्याशिवाय महावितरणसमोर कोणताच पर्याय नाही. त्यामुळे थकबाकीदार ग्राहकांनी वीजबिल तातडीने भरून महावितरणला सहकार्य करावे.

-सुनील देशपांडे, मुख्य अभियंता, चंद्रपूर परिमंडळ

Web Title: 611 crore 11 lakh electricity bill arrears in Chandrapur circle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.