शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

५०० शिक्षक निघाले पायी दिंडी आंदोलनाला !

By admin | Updated: December 5, 2015 00:54 IST

ग्रामीण भागात सर्वदूर शिक्षण मिळावे, या उदात्त हेतूने शासनाने मागील १५-२० वर्षात अनेक खासगी संस्थांना शाळांची खैरात वाटली.

तीन दिवस शाळा बंद : महाआंदोलनात ‘करा अथवा मरा’चा नाराजिवती : ग्रामीण भागात सर्वदूर शिक्षण मिळावे, या उदात्त हेतूने शासनाने मागील १५-२० वर्षात अनेक खासगी संस्थांना शाळांची खैरात वाटली. पण त्या शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांच्या पोटाचा प्रश्न मात्र अजूनही ऐरणीवरच आहे. त्यांच्याकडे लक्ष द्यायला सरकारला अजूनही मुहूर्त सापडला नाही. आता सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विनाअनुदानित शाळेचे कर्मचारी ५ ते ७ डिसेंबरला सेवाग्राम ते नागपूर असा पायीदिंडी प्रवास करणार आहेत. यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून पाचशे कर्मचारी सेवाग्रामकडे रवाना झाले आहेत.१५ ते १६ वर्षापासून विनाअनुदानित शाळेतील शिक्षक उपाशीपोटी काम करत असताना शासनाला याचे काहीही सोयरसुतक नाही. अनेक शाळांना अनुदान पात्र घोषित करण्यात आले. काही शाळा पात्र असून अघोषित आहेत. पण त्यांना शासनाने निधी मंजूर केलेला नाही. या मागणीसाठी आजपर्यंत महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानीत शाळा कृती समितीचे सव्वाशेच्यावर आंदोलनेही झालीत. पण आश्वासनापलिकडे शासन काहीही देऊ शकले नाही.२००९ मध्ये कायम शब्द वगळ्यात आला. आता विनाअनुदानीत शाळांना लवकरच अनुदान मिळेल, अशी आशा कर्मचाऱ्यांत पल्लवित झाली. पण आजतागायत काहीच झालेले नाही.बिनपगारी आपल्या कुटुंबाचा भार सोसताना काहींनी आपले जीवनच संपवून घेतले. पगारही नाही आणि जगण्याचे साधनही नाही. या चक्रात राज्यातील २२ हजार शिक्षक भरडले जात आहेत. मागील अधिवेशनात शिक्षणमंत्र्यांनी विनाअनुदानीत शाळांना अनुदान सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते आजवर पूर्ण झाले नाही. यात दोष कुणाचा हा प्रश्न अनुत्तरीत आहे. उद्या ५ डिसेंबरपासून सेवाग्राम ते नागपूर अशी पायी दिंडी व नागपूरला होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर महामोर्चा आयोजित केला आहे. यासाठी राज्यातील हजारो शिक्षक सहभागी होत आहेत. शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर, शिक्षक आमदार नागो गाणार, श्रीकांत देशपांडे, कपील पाटील, रामदास माते असे अनेक शिक्षक व पदविधर आमदार सरकारच्या विरोधात शिक्षकांना पाठींबा देत असून दिंडीत सहभागी होत आहेत. एवढेच नाहीतर ५ ते ८ डिसेंबरला शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. (शहर प्रतिनिधी)गेल्या दोन महिन्यांपासून विनाअनुदानीत शाळेवर काम करणाऱ्या शिक्षकांच्या अनुदानासंदर्भात आपण स्वत: पक्षातील वरिष्ठांशी व शिक्षणमंत्री, अर्थमंत्री, मुख्यमंत्री यांच्याशी बोललो आहे. शिवसेना शिक्षकांच्या पाठीशी असून शिक्षणमंत्री, अर्थमंत्री हेदेखील निधी मंजूर करण्यास सकारात्मक दिसले आहेत. परंतु यांच्याकडून आजपर्यंत मिळणारे आश्वासन पाहता गप्प बसून चालणार नाही. म्हणून पायीदिंडी आंदोलनाचे आपण स्वत: नेतृत्व करीत आहे. जोपर्यंत प्रश्न निकाली निघणार नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही.-बाळू धानोरकर, आमदार, वरोरा विधानसभा.