शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

५० टक्के कापूस घरातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 05:00 IST

दोन्ही तालुक्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी असल्याने सर्वच जिनिंगवर सीसीआयकडून कापूस खरेदी करण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. खरीप हंगाम तोंडावर आल्यामुळे शेतकरी आर्थिक जुळवाजुळव करीत आहे. पीक कर्ज फेडून नवीन कर्ज घेण्यासाठी बँकांसमोर गर्दी करू लागला. परंतु, लॉकडावूनचा गैरफायदा व्यापारी घेत आहेत.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाच्या आदेशाला ठेंगा : खरेदीअभावी शेतकऱ्यांची कोंडी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कापूस खरेदीची कोंडी दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मागील आठवड्यात जिनिंग मालक व व्यापाऱ्यांची बैठक पार पडली. शेतकऱ्यांची अडवणूक न करता जादा गाड्यातील कापूस खरेदीचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, या आदेशाला ठेंगा दाखविल्याने राजुरा, कोरपना, चंद्रपूर, भद्रावती व वरोरा तालुक्यातील ५० टक्के शेतकºयांचा कापूस खरेदीअभावी घरातच पडून असल्याचे चित्र आहे.राजुरा कोरपना तालुक्यात शासनाने केवळ ४ केंद्रावर कापसाची नाममात्र खरेदी सुरू आहे. सीसीआयमार्फत कापूस खरेदी करण्यासाठी राजुरा कृषी उत्पन्न बाजार समितीकडे ८ हजार तर कोरपना बाजार समितीकडे ७ हजार ५०० पेक्षा अधिक कापूस गाड्यांची नोंदणी शेतकऱ्यांनी केली आहे. दोन्ही तालुक्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी असल्याने सर्वच जिनिंगवर सीसीआयकडून कापूस खरेदी करण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. खरीप हंगाम तोंडावर आल्यामुळे शेतकरी आर्थिक जुळवाजुळव करीत आहे. पीक कर्ज फेडून नवीन कर्ज घेण्यासाठी बँकांसमोर गर्दी करू लागला. परंतु, लॉकडावूनचा गैरफायदा व्यापारी घेत आहेत. कापूस खरेदीवर शासनाचे नियंत्रण नसल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशाची अवहेलना करणाऱ्या व्यापाऱ्यांवर चौकशी करून गुन्हे दाखल करावे, अन्यथा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा चंद्रपुरातील ज्येष्ठ विधीतज्ञ अ‍ॅड. पुरूषोत्तम सातपुते, माजी आमदार सुदर्शन निमकर, सुधाकर गोरे, ज्ञानेश्वर बेरड, काशीनाथ गोरे व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आदींनी मागील आठवड्यात जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे दिला होता. परंतु, त्यानंतरही जिल्ह्यातील कापूस खरेदीला वेग आला नाही. शेकडो शेतकरी केंद्रासमोर ताटकळत असून वाहनभाडे व अन्य खर्चाचा भुर्दंड बसणार आहे.पैशाअभावी खरीप हंगाम संकटातपाऊस सुरू होण्याआधीच शेतकऱ्यांचा कापूस विकला जाणे अत्यावश्यक आहे. खरीप हंगामासाठी बियाणे व खते विकत घेण्याकरिता कापशी पिकाचाच मोठा आधार असतो. परंतु, सीसीआयच्या खरेदीला वेग नाही. कापूस विकला नाही तर हंगाम कसा करणार, याची शेतकऱ्यांना चिंता आहे.सीसीआयची तालुकानिहाय खरेदीराजुरा येथील केंद्रावर ७ हजार ८०० शेतकºयांनी नोंदणी केली. सीसीआयने फक्त २५२ गाड्यांतील कापूस खरेदी केला. कोरपना येथील उत्पन्न बाजार समितीत ७ हजार ६३८ नोंदणी केल्यानंतर ५४५ गाड्या, चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत ३ हजार ९६७ शेतकऱ्यांची नोंदणी व खरेदी १७० गाड्या, भद्रावती कृषी बाजार समितीत २ हजार ८५७ शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यानंतर आतापर्यंत ४२० गाड्यांतील कापूस सीसीआयने खरेदी केला आहे.

टॅग्स :cottonकापूस