शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बाबुपेठ उड्डाण पुलासाठी ५ कोटी मंजूर

By admin | Updated: May 8, 2015 01:14 IST

बहुप्रतीक्षित बाबुपेठ उड्डाण पुलाला शासनाने अंतिम मंजूरी दिली आहे.

चंद्रपूर : बहुप्रतीक्षित बाबुपेठ उड्डाण पुलाला शासनाने अंतिम मंजूरी दिली आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी राज्य शासनाने पाच कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. नगरविकास विभागाच्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत महानगरपालिकांना अनुदान या शिषातंर्गत हा निधी मंजूर करण्यात असून उड्डाण पूल बांधकामाचा मार्ग आता सुकर झाला आहे.मागील १५ ते २० वर्षांपासून बाबुपेठ येथे रेल्वे उड्डाण पुल बांधकामाची मागणी सातत्याने होत आहे. यासाठी अनेकवेळा उपोषण, आंदोलन, मोर्र्चेही काढण्यात आली. इको-प्रो तथा अनेक संस्था संघटनांनी आंदोलन उभे करून ही मागणी शासन दरबारी रेटून धरली. राजकीय स्वार्थासाठी अनेकवेळा या पुलाची मागणी मागे पडत गेली. मात्र आता या पुलाला मंजुरी मिळून निधीही मंजूर झाला आहे. नगरविकास विभागाच्या ४ एप्रिल रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यातील महानगरपालिकांना त्यांच्या क्षेत्रात मुलभूत सोयी-सुविधांच्या विकास कामांसाठी विशेष अनुदान देण्याच्या बाबीअंतर्गत निधी मंजूर केला. यात बाबुपेठ रेल्वे उड्डाणपुलासाठी ५ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जानेवारी महिन्यात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांना बाबूपेठ रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी निधीची मागणी करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सदर उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी निधीचा प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रस्तावाला मान्यता देत नगरविकास विभागाने उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी ५ कोटी रूपये मंजूर केले. त्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून प्रलंबित मागणीच्या पुर्ततेचा मार्ग मोकळा झाला आहे. यापूर्वी बाबुपेठ उड्डाण पुलाचे काम चंद्रपूर पंचशताब्दी निधीअंतर्गत करण्याचे ठरले होते. कागदोपत्री सोपस्कारही पूर्ण करण्यात आले. दरम्यान वित्तमंत्र्यांनी पंचशताब्दीअंतर्गत येणारा दुसऱ्या टप्प्यातील निधी देणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर या पुलासंदर्भात तर्कवितर्क लावण्यात आले. निधी कोणत्याही नावाने येणार, मात्र पुलाचे बांधकाम होणारच, असे आमदार नाना शामकुळे यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. (स्थानिक प्रतिनिधी)