एका महिन्यात ३२ लाखांचा दारूसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:21 IST2021-05-28T04:21:34+5:302021-05-28T04:21:34+5:30

सिंदेवाही : सिंदेवाही पोलीस स्टेशन अंतर्गत तालुक्याच्या विविध ठिकाणी गेल्या एक महिन्यापासून सतत अवैध हातभट्टी मोहा दारू विरोधात ...

32 lakh liquor seized in one month | एका महिन्यात ३२ लाखांचा दारूसाठा जप्त

एका महिन्यात ३२ लाखांचा दारूसाठा जप्त

सिंदेवाही : सिंदेवाही पोलीस स्टेशन अंतर्गत तालुक्याच्या विविध ठिकाणी गेल्या एक महिन्यापासून सतत अवैध हातभट्टी मोहा दारू विरोधात अभियान सुरू केलेले आहे. २० एप्रिल ते २० मे दरम्यान महिन्याभरात ३१ लाख ७२ हजार ९५० रुपये दारूसाठा जप्त केला असून एकूण आतापर्यंत ६२ केसेस दाखल करण्यात आल्या आहेत.

या अभियानांतर्गत वासेरा, सरटपार, गुंजेवाही, पळसगाव, नवरगाव, मोहाडी, शिवनी, अंतरगाव अशा ठिकाणी जंगल परिसरात सिंदेवाही पोलिसांनी सर्च अभियान राबवून हातभट्टी मोहा साहित्य उद्ध्वस्त करून दारूबंदी कायद्यांतर्गत आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैधरीत्या दारू काढणाऱ्यांचे मात्र धाबे दणाणले आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे, पोलीस निरीक्षक योगेश घारे, पीएसआय गोपीचंद नेरकर व त्यांच्या पथकाने केली.

Web Title: 32 lakh liquor seized in one month