३०२ कोरोनामुक्त तर १९७ नवे बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2020 05:00 AM2020-10-25T05:00:00+5:302020-10-25T05:00:24+5:30

शनिवारी चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतकांमध्ये चंद्रपूर शहरातील बाबुपेठ येथील २७ वर्षीय पुरुष, जुनोना चौक येथील ६८ वर्षीय महिला, चिमूर येथील ५६ वर्षीय पुरुष तर वर्धा जिल्ह्यातील ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २१७ बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील २०५ बाधिताचा समावेश आहे.

302 coronal free and 197 newly blocked | ३०२ कोरोनामुक्त तर १९७ नवे बाधित

३०२ कोरोनामुक्त तर १९७ नवे बाधित

Next
ठळक मुद्देएकूण बाधित १४५८४ । उपचार घेत असलेले बाधित २९२८

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात शनिवारी ३०२ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर १९७ जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत.
नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या १९७ बाधितांसोबत आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या १४ हजार ५८४ वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ११ हजार ४३९ झाली आहे. सध्या दोन हजार ९२८ बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख १४ हजार ६३२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ९८ हजार ५५६ नमुने निगेटिव्ह आले आहे. चंद्रपूर शहरातील व परिसरातील भानापेठ वार्ड, रयतवारी कॉलरी, मार्डा, सुभाष नगर, दुर्गापूर, स्नेहनगर, जुनोना चौक परिसर, भिवापूर वॉर्ड, लखमापूर, जलनगर, बालाजी वार्ड, वडगाव, राष्ट्रवादी नगर, हनुमान नगर, तीर्थरूप नगर, तुकूम, सरकार नगर, गौतम नगर, माता नगर, इंदिरानगर, बापट नगर, बालाजी वार्ड, विठ्ठल मंदिर वार्ड भागातून बाधित पुढे आले आहे.
बल्लारपूर तालुक्यातील बामणी, दूधोली, कोठारी भागातून बाधित ठरले आहे. वरोरा तालुक्यातील आनंदवन परिसर, बावणे लेआउट परिसर, हनुमान वार्ड, सोईट परिसरातून पॉझिटीव्ह पुढे आले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील पटेल नगर, शेष नगर, देलनवाडी, बोरगाव, कुरझा, नवेगाव, मेढकी, हलदा परिसरातून बाधित ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील सुरक्षा नगर, आंबेडकर वार्ड, नवीन सुमठाना, गुरु नगर, भंगाराम वार्ड, डिफेन्स चांदा परिसर,सागरा,माजरी कॉलनी परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. राजुरा तालुक्यातील चौगान, शिवाजी वार्ड, रामनगर भागातून बाधित पुढे आले आहे. सिंदेवाही तालुक्यातील मोहाडी, नवेगाव, लोनखैरी परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. नागभीड तालुक्यातील तळोधी, कन्हाळगाव, गोवर्धन चौक परिसर, नवखळा, वलणी, बाळापूर, पुलगाव भागातून बाधित पुढे आले आहे. कोरपना तालुक्यातील माणिकगड कॉलनी परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.

तालुकानिहाय नवे बाधित
जिल्ह्यात शनिवारी पुढे आलेल्या १९७ बाधितांमध्ये १०८ पुरुष व ८९ महिला आहेत. यात चंद्रपूर शहर व परिसरातील ६७, पोंभुर्णा तालुक्यातील ११, बल्लारपूर तालुक्यातील सहा, मुल तालुक्यातील ३५, गोंडपिपरी तालुक्यातील पाच, जिवती तालुक्यातील एक, कोरपना तालुक्यातील सहा, ब्रह्मपुरी तालुक्यातील ११, नागभीड तालुक्यातील १६, वरोरा तालुक्यातील १३, भद्रावती तालुक्यातील ११, सावली तालुक्यातील एक, सिंदेवाही तालुक्यातील तीन, राजुरा तालुक्यातील तीन, गडचिरोली सात तर वणी-यवतमाळ येथील एक असे एकूण १९७ बाधित पुढे आले आहे

आणखी चार जणांचा मृत्यू
शनिवारी चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतकांमध्ये चंद्रपूर शहरातील बाबुपेठ येथील २७ वर्षीय पुरुष, जुनोना चौक येथील ६८ वर्षीय महिला, चिमूर येथील ५६ वर्षीय पुरुष तर वर्धा जिल्ह्यातील ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २१७ बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील २०५ बाधिताचा समावेश आहे.

Web Title: 302 coronal free and 197 newly blocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.