शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ३० टक्के बसेस अद्यापही आगारातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 05:00 IST

चंद्रपूर विभागाअंतर्गत चंद्रपूर, वरोरा, चिमूर आणि राजुरा हे आगार येतात. या आगारातून ग्रामीण भागातील शेवटच्या टोकापर्यंत बसेस चालविल्या जातात. मात्र, लाॅकडाऊन झाल्यानंतर बस बंद करण्यात आल्या. कोरोना रुग्ण कमी झाल्यानंतर नागपूर तसेच लांब पल्ल्याच्या अन्य बसेस सुरू करण्यात आल्या. मात्र, आजही ग्रामीण भागात एसटी पोहोचली नसून येथील नागरिकांनी काळीपिवळी, ऑटो तसेच दुचाकीने शहरात यावे लागत आहे. यामध्ये त्यांना आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. 

ठळक मुद्देप्रवाशांना काळीपिवळीचा आधार : सुरक्षित प्रवासापासून ग्रामीण नागरिक दुरच

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना संकटामुळे लाॅकडाऊन करण्यात आले. त्यानंतर बससेवासुद्धा बंद करण्यात आली होती. सद्यस्थितीत अनलाॅक झाले असले तरी ७० टक्केच बस रस्त्याने धावत आहेत. परिणामी ग्रामीण प्रवाशांना  त्रास सहन करावा लागत असून त्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.चंद्रपूर विभागाअंतर्गत चंद्रपूर, वरोरा, चिमूर आणि राजुरा हे आगार येतात. या आगारातून ग्रामीण भागातील शेवटच्या टोकापर्यंत बसेस चालविल्या जातात. मात्र, लाॅकडाऊन झाल्यानंतर बस बंद करण्यात आल्या. कोरोना रुग्ण कमी झाल्यानंतर नागपूर तसेच लांब पल्ल्याच्या अन्य बसेस सुरू करण्यात आल्या. मात्र, आजही ग्रामीण भागात एसटी पोहोचली नसून येथील नागरिकांनी काळीपिवळी, ऑटो तसेच दुचाकीने शहरात यावे लागत आहे. यामध्ये त्यांना आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. चंद्रपूर विभागामध्ये २४५ बसेस असून, १ हजार ५०५ कर्मचारी आहे. मात्र, सद्यस्थितीत ७० टक्केच बसेस चालविल्या जात आहेत.बंद असलेल्या फेऱ्या सुरु करण्याची मागणी आहे.

या गावांना बस कधीnराजुरा तालुक्यातील गोवरी, मानोली, बाबापूर, कढोली, साखरी, पवनी, मार्डा आदी, कोरपना तालुक्यात मांगलहिरा, येरगवान, कोडशी, चंद्रपूर-कोरपना (भोयेगाव मार्गे), जिवती तालुक्यातील गडचांदूर-जिवती येलापूर ही बस बंद आहे.nराजुरा-गडचांदूर-शेणगाव, भारी, बाबापूर, राजुरा- पुडियाल मोहदा, राजुरा-गडचांदूर, शेणगाव-टेकामांडवा, नागभीड तालुक्यात नागभीड-बाळापूर, नागभीड मौशी आदी बस फेऱ्या बंद आहे.

प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार

चंद्रपूर जिल्ह्याची औद्योगिक जिल्हा म्हणून ओळख आहे. त्यामुळे रोजगारासाठी इतर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने येथे नागरिक येतात. मात्र लाॅकडाऊननंतर बऱ्याच गावातील बस अद्यापही बंद आहे. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. विशेषत: नागपूर तसेच इतर काही मोठ्या शहरांसाठी ट्रॅव्हर्स आहे. मात्र ग्रामीण भागातील नागरिकांना जाण्यासाठी काळीपिवळी, ग्रामीण ऑटोचांच आधार आहे.

काय म्हणतात प्रवास करणारे

लाॅकडाऊननंतर अनेक गावातील बसफेऱ्या बंद आहे. त्यामुळे ग्रामीण नागरिकांना शहरात येण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. यामध्ये अतिरिक्त पैसा मोजावा लागत असून प्रवास करणे कठीण झाले आहे.विजय ठाकरे, प्रवासी

लाॅकडऊनमुळे बसफेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. आजही अनेक गावातील बस सुरु झाल्या नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांसह कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महामंडळाने पूर्वीप्रमाणे सर्व बसफेऱ्या सुरु कराव्या.- रमेश कोडापे, प्रवासी

 

टॅग्स :state transportएसटी