शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कत्तलीसाठी जाणारी २६ जनावरे पकडली

By admin | Updated: March 14, 2016 01:02 IST

कत्तलीसाठी जाणारी २६ जनावरे येथील विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या सतकर्तेमुळे पोलिसांनी पकडली.

भद्रावती पोलिसांची कारवाई : एकास अटक, तिघे फरारभद्रावती : कत्तलीसाठी जाणारी २६ जनावरे येथील विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या सतकर्तेमुळे पोलिसांनी पकडली. ही कारवाई रविवारी करण्यात आली.भद्रावती शहरापासून सहा किमी अंतरावर असलेल्या बोनथाळा शेतशिवारातून कत्तलीसाठी जनावरे नेण्याची तयारी सुरू असल्याची माहिती बजरंग दल व विहिंपच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यांनी लगेच सकाळी ११ ते दुपारी १२ वाजताच्या दरम्यान घटनास्थळाकडे धाव घेतली असता, तेथे त्यांना २६ गुरे आढळून आली. याबाबत विचारणा केली असता, गुरांसोबत असलेल्या चार इसमांनी ही गुरे कत्तलीसाठी चालल्याचे सांगितले. यात २५ बैल व एका गाईचा समावेश होता. यापैकी तीन बैल अत्यंत जखमी अवस्थेत होते. कार्यकर्त्यांनी लगेच भ्रमणध्वनी वरुन भद्रावती पोलिसांना माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक धोकटे हे दोन पोलीसासह घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी ‘त्या’चार इसमापैकी एकाला ताब्यात घेतले व जनावरे गोशाळेत घेऊन चलायला सांगितले. या दरम्यान तीन आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले.पकडलेली जनावरे येथील जैन मंदिराच्या गोशाळेत दाखल करण्यात आली असून आरोपी शेख अब्बू शेख अहमद (४६) रा. भंगाराम वार्ड भद्रावती यास अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (शहर प्रतिनिधी)