शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणुकीसाठी २३७ बसेस आरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 06:00 IST

विधानसभा निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाचे १० हजारांहून अधिक कर्मचारी रात्रंदिवस काम करत आहेत. जिल्ह्यातील बल्लारपूर, राजुरा, वरोरा, ब्रह्मपुरी, चिमूर आणि चंद्रपूर तालुक्यात दळणवळण सुविधांचा अभाव असलेल्या ग्रामीण भागात वाहतुकीसाठी एसटी हा उत्तम पर्याय आहे.

ठळक मुद्दे५१ रूपये प्रती किमी दर निश्चित : महामंडळाला मिळणार कोटींचे उत्पन्न

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : २१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाने २३७ बसेस आरक्षिण केल्या आहेत. यामुळे एसटी महामंडळाला कोटींचे उत्पन्न मिळणार आहे.विधानसभा निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाचे १० हजारांहून अधिक कर्मचारी रात्रंदिवस काम करत आहेत. जिल्ह्यातील बल्लारपूर, राजुरा, वरोरा, ब्रह्मपुरी, चिमूर आणि चंद्रपूर तालुक्यात दळणवळण सुविधांचा अभाव असलेल्या ग्रामीण भागात वाहतुकीसाठी एसटी हा उत्तम पर्याय आहे. मतदान केंद्रावरील नियुक्त कर्मचारी आणि प्रशासकीय साहित्याच्या वाहतुकीसाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाने २३७ बसेसची मागणी एसटी महामंडळाकडे नोंदवली आहे. कर्मचाऱ्यांना प्रवासादरम्यान अडचणी येऊ नये, याकरिता काही दिवसांत अतिरिक्त बसेसचीही मागणी केल्या जाऊ शकते.मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजे २० ऑक्टोबर आणि मतदानाच्या दिवशी २१ ऑक्टोबर २०१९ रोजी असे दोन दिवस एसटी महामंडळाकडून जिल्हा निवडणूक प्रशासनाला सेवा पुरविण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर मतदार यंत्र पोहचविणे आणि मतमोजणीच्या ठिकाणी नेण्यासाठी एसटीचा वापर केला जाणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी प्रति किलोमीटर ५१ रूपये हा दर निश्चित करण्यात आला आहे. खासगी वाहनाच्या तुलनेत एसटीचे दर कमी आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या कामासाठी शासनाने एसटीला प्रथम प्राधान्य दिले. या निर्णयामुळे एसटी महामंडळाचे उत्पन्नही वाढणार आहे. सहा महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत एसटी महामंडळाला आर्थिक फायदा झाला होता. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी शेकडो बसेस आरक्षित करण्यात आल्या होत्या. त्या माध्यमातून एसटी महामंडळाला सुमारे कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले होते. परंतु, ही रक्क्कम अद्याप मिळाली नसल्याचे समजते.व्हीटीएस प्रणालीमुळे प्राधान्यचंद्रपूर विभागात एसटी महामंडळात शिवशाही, निमआराम, साधी लालपरी व शहरी बसेसचा समावेश आहे. जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या मागणीनुसार एसटी महामंडळ बसेस उपलब्ध करून देणार आहे. बहुतांश बसेसला व्हीटीएस अर्थात व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम बसविण्यात आले. त्यामुळे निवडणूक विभागाने एसटीला प्राधान्य दिले आहे.सर्वांचेजिल्हा निवडणूक प्रशासनान केलेल्या मागणीनुसार बसेस आरक्षित करण्यात आल्या आहेत. या सर्व बसेसमध्ये उत्तम सुविधा आहेत. प्रवाशांना नियमित सेवा देत असताना प्रशासनाकडून मागणी वाढली तरी बसेस पुरवण्याचे नियोजन तयार करण्यात आले.- आर. एन. पाटील, विभागीय नियंत्रक, चंद्रपूर

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरstate transportएसटी