शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

२० वरिष्ठ महाविद्यालये बंद

By admin | Updated: June 16, 2017 00:31 IST

चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यासाठी स्थापन झालेल्या गोंडवाना विद्यापीठात महाविद्यालयाचे संलग्नीकरण न केल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील तब्बल २० वरिष्ठ महाविद्यालये

गोंडवाना विद्यापीठाची अधिसूचना : विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेण्याचे आवाहन लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यासाठी स्थापन झालेल्या गोंडवाना विद्यापीठात महाविद्यालयाचे संलग्नीकरण न केल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील तब्बल २० वरिष्ठ महाविद्यालये बंद करण्याची पाळी आली आहेत. विद्यापीठाच्या विद्वत व व्यवस्थापन परिषदेने ही वरिष्ठ महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला असून गोंडवाना विद्यापीठाने नुकतीच अधिसूचना प्रकाशित केली आहे. या महाविद्यालयात कोणत्याही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी सन २००९ ला गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीची स्थापना करण्यात आली. २०१० पासून विद्यापीठाच्या कामकाजाला सुरूवात झाली. या विद्यापीठात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील दीडशेच्या जवळपास वरिष्ठ महाविद्यालयांचा समावेश आहे. विद्यापीठाच्या ध्येय धोरणानुसार वरिष्ठ महाविद्यालयांना दरवर्षी विद्यापीठाशी संलग्नीकरण करावे लागत असते. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील तब्बल २० वरिष्ठ महाविद्यालयांनी गेल्या तीन वर्षांपासून विद्यापीठाशी संलग्नीकरण केलेले नाही. त्यामुळे ही महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या विद्वत परिषदेने २५ एप्रिल २०१७ ला बाब क्र. १६ व १७ अन्वये तर २८ एप्रिल १०१७ ला व्यवस्थापन परिषदेने बाब क्र. १४ मधील ५, ६, ७ अन्वये घेतला आहे. या निर्णयानुसार शैक्षणिक क्षेत्र २०१७-१८ पासून ही वरिष्ठ महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे या महाविद्यालयात कोणत्याही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. बंद करण्यात आलेली वरिष्ठ महाविद्यालयेविद्यापीठाशी संलग्नीकरण न केल्याने बंद करण्यात आलेल्या महाविद्यालयांमध्ये श्री संत शुन्योजी महाराज शिक्षण महाविद्यालय, गडचांदूर, शंकरय्या देशमुख महाविद्यालय, वरोरा, राजीव गांधी कॉलेज आॅफ कॉम्प्युटर एज्युकेशन चिमूर, आचार्य विनोबा भावे कॉलेज आॅफ आर्ट्स कॉमर्स अ‍ॅन्ड सायन्स सिव्हिल लाईन्स चंद्रपूर, आचार्य विनोबा भावे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वरोरा आचार्य विनोबा भावे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बल्लारपूर, आचार्य विनोबा भावे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी, जैनुद्दीन जव्हेरी महाविद्यालय, तुकूम, फेअरीलॅन्ड कॉलेज आॅफ सायन्स कॉमर्स अ‍ॅन्ड मॅनेजमेंट भद्रावती, लोकमान्य टिळक महाविद्यालय चंद्रपूर, भाऊराव पाटील चटप शारीरिक शिक्षण महाविद्यालय, राजुरा, श्रीमती कमलताई वडेट्टीवार शिक्षण महाविद्यालय, सिंदेवाही अब्दुल अजीज धम्मानी महाविद्यालय, नागभीड, चंद्रपूर शारीरिक शिक्षण महाविद्यालय, रामनगर, चंद्रपूर, जिजामाता कॉलेज आॅफ कम्प्युटर सायन्स अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी सुमठाना, भद्रावती, इंदिरा गांधी महाविद्यालय चंद्रपूर, स्व. भिवाजी वरभे वाणिज्य अ‍ॅन्ड सायन्स वरिष्ठ महाविद्यालय, चंद्रपूर, निरंजन ज्योतिबा फुले महाविद्यालय, चंद्रपूर, लक्ष्मीबाई मामुलकर महिला महाविद्यालय राजुरा या महाविद्यालयांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांची फसगत होण्याचा धोकाविद्यापीठाच्या विद्वत व व्यवस्थापन समितीने जिल्ह्यातील २० वरिष्ठ महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला असला तरी अनेक विद्यार्थ्यांना याबाबत माहिती नाही. सध्या बारावीचा निकाल लागला असून वरिष्ठ महाविद्यालयात तसेच शिक्षण महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली आहे. मात्र नव्या सत्रापासून महाविद्यालय बंद करण्यात आले आहे, याबाबत सांगितले जात नाही. केवळ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती हळपण्यासाठी महाविद्यालयात प्रवेश दिल्याचा प्रकार काही दिवसांपुर्वी जिल्ह्यात उघडकीस आला आहे. अशा महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर गुन्हे सुद्धा दाखल झाले आहेत. त्यामुळे बंद करण्यात आलेल्या महाविद्यालयात विद्यार्थ्याला प्रवेश मिळाल्यास समोर त्याची फसगत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यापीठाच्या विद्वत व व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील २० तर गडचिरोली जिल्ह्यातील १० वरिष्ठ महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. ही महाविद्यालये नव्या शैक्षणिक सत्रापासून बंद होणार असून या महाविद्यालयात कोणत्याही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये. समजा महाविद्यालयाने प्रवेश दिलाच तर विद्यापीठाच्या संकेतस्थळावर महाविद्यालयाची लॉगीन आयडी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याची फसगत होण्याचा प्रश्नच नाही. - दीपक जुनघरे,प्रभारी कुलसचिव गोंडवाना विद्यापी, गडचिरोली.