शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरच्या विकास कामांसाठी २० कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2016 02:18 IST

राज्याचे वित्त आणि नियोजन, वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने

वित्तमंत्र्यांचा पुढाकार : नगर विकास विभागाची मंजुरी चंद्रपूर : राज्याचे वित्त आणि नियोजन, वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकासकामांसाठी २० कोटी १२ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाच्या १५ आॅक्टोबर च्या पत्रानुसार नगर परिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान या शिर्षांतर्गत सदर निधी मंजूर करण्यात आला आहे. चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील बाबुपेठ परिसरात स्टेडियम उभारले जाणार असून यासाठी दोन कोटी ८० लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. ऐके काळचा कोणेरी तलाव असलेला आणि आताचे कोहीनूर स्टेडियमच्या नूतनीकरणाचे काम महानगर पालिकेने प्रस्तावित केले होते. यासाठी ६० लाखांचा निधी मिळणार आहे. प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहाची दुरूस्ती व नुतनीकरणाचे काम सुरू आहे. येत्या तीन महिन्यात हे काम पूर्णत्वास येणार असून यासाठी सहा कोटी १९ लाख ८९ हजार रूपये मंजूर झाले आहेत. चौक आणि सार्वजनिक भुखंडांचाही विकास होणार आहे. नागपूर रोडवरील डॉ. धांडे यांच्या घरासमोरील खुल्या जागेच्या विकासासाठी ४० लाख मिळणार आहेत. तर, बस स्थानक ते सावरकर चौकापर्यंतच्या रस्ता विकसित करण्यासाठी चार कोटी आठ लाख रूपये मिळणार आहेत. वाहतूक नियंत्रण कार्यालयाजवळील चौक विकसित करण्यासाठी एक कोटी ७५ लाख रूपये मिळत आहेत. प्रोफेसर कॉलनीतील खुल्या जागेला संरक्षक भिंत आणि सामाजिक सभागृहाच्या बांधकामासाठी ३३ लाख ९० हजार रूपये मिळत आहेत. उर्जाबचत व नवीन आधुनिक पद्धतीचे पथदिवे शहरात उभारले जाणार आहेत. इरई नदी ते वडगावपर्यंतच्या या कामासाठी ८१ लाख ७१ हजार रूपयांचा तर, जयका आॅटो कंपनीपासून भागवत आर्केडपर्यंतच्या कामासाठी ५९ लाख ४८ हजार रूपये मिळणार आहेत. पोलिसांसाठी दीड कोटी रूपये खर्चून अत्याधुनिक जिम बांधले जाणार आहे. रय्यतवारी प्रभागमध्ये ४१ लाख तीन हजार रूपये खर्चून कॉंक्रीट रोड बांधला जाणार आहे. वडगाव प्रभागात काँक्रीट मार्ग विकसित करण्यासाठी ५१ लाख नऊ हजार रूपये मंजूर झाले आहेत. असा २० कोटी १२ लाख रूपयांचा निधी चंद्रपुरातील विकासकामांसाठी मिळणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)