शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

नवीन २३ नमुन्यांपैकी १५ नमुने निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 5:00 AM

जिल्ह्यातील संभाव्य उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पुन्हा एकदा मॉकड्रील घेण्यात आली. आपल्याकडे उद्रेक झाल्यास आरोग्य यंत्रणा, जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा कशा पद्धतीने काम करेल, याची ही रंगीत तालीम होती. अशाच पद्धतीची रंगीत तालीम प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी घेण्यासंदर्भात निर्देश देण्यात आले असून कोरोनाच्या संभाव्य प्रादुर्भाव लक्षात घेता प्रत्येक ठिकाणी हा सराव केला जाणार आहे.

ठळक मुद्देआठ नमुन्यांचा अहवाल अप्राप्त : पुढचे काही दिवस संयम पाळा, जिल्हाधिकाऱ्यांचे जिल्हावासीयांना आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात असणाऱ्या गावांमधील नागरिकांनी स्वत:च्या गावाच्या रक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. गावात येणाºया प्रत्येकाची नोंद ठेवली जात आहे. त्याचप्रमाणे शहरातील नागरिकांनीदेखील आजूबाजूच्या आजारी व संशयित रुग्णांबाबत जागरूकता बाळगावी. वेळोवेळी प्रशासनाला माहिती द्यावी. सध्या जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. नवीन २३ नमुन्यांपैकी १५ नमुने निगेटिव्ह आले आहेत. आठ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. पुढील काही दिवस घराबाहेर न पडता सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.जिल्ह्यातील संभाव्य उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पुन्हा एकदा मॉकड्रील घेण्यात आली. आपल्याकडे उद्रेक झाल्यास आरोग्य यंत्रणा, जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा कशा पद्धतीने काम करेल, याची ही रंगीत तालीम होती. अशाच पद्धतीची रंगीत तालीम प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी घेण्यासंदर्भात निर्देश देण्यात आले असून कोरोनाच्या संभाव्य प्रादुर्भाव लक्षात घेता प्रत्येक ठिकाणी हा सराव केला जाणार आहे.नागरिकांनी आवश्यकता नसताना घराबाहेर पडू नये. घरातील कोणत्याही एका व्यक्तीने गरजेसाठी आठवडयातून एकदाच बाहेर पडण्याची सवय लावावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.आरोग्य विभागाचे जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम यांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन २३ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यापैकी १५ नमुने निगेटिव आहेत. आठ नमुन्यांचा अहवाल अद्याप बाकी आहे. जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही.महानगरपालिकेकडून दररोज निराधार, गरीब कुटुंबांना अन्न पुरविले जात आहे.जिल्ह्यात ४१ निवाराकक्षजिल्हा प्रशासनाला एकीकडे आरोग्य यंत्रणा बळकट करताना दुसºया बाजूने लाकडाऊनमुळे अडकून पडलेल्या दुसºया राज्यातील व जिल्ह्यातील शेकडो लोकांच्या निवारा व भोजनाची व्यवस्था करावी लागत आहे. जिल्ह्यात सर्व तालुक्यांसह प्रमुख शहरांमध्ये ४१ निवारा कक्ष उघडण्यात आले आहे. यामध्ये अडकून पडलेल्या नागरिकांच्या राहण्याची अंथरूण-पांघरूणाची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच जे बेघर आहेत. विमनस्क, एकटे व ज्यांच्याकडे स्वयंपाक करण्याची यंत्रणाच नाही, अशा नागरिकांसाठी शहरातील स्वयंसेवी संस्था पुढे आल्या आहेत. त्यांच्या मदतीने महानगरपालिकेच्या नियोजनात कम्युनिटी किचन अविरत सुरू आहे.जिल्ह्यात १०३ जण नव्याने क्वारंटाईनजिल्ह्यातील १०३ जणांना गुरुवारी नव्याने होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. यात चंद्रपूर-६, वरोरा-१५, पोंभूर्णा-४, जिवती-२०, बल्लारपूर-२८, गोंडपिपरी-६ व ब्रह्मपुरीतील २४ जणांचा समावेश आहे.१९,९९० जणांचे होम क्वारंटाईन पूर्णजिल्ह्यांमध्ये आतापर्यंत बाहेर देशातून व अन्य राज्यातून, अन्य जिल्ह्यातून आलेल्या प्रवाशांची संख्या २६ हजार ५३६ आहे. सध्या निगराणीमध्ये असणाºया प्रवाशांची संख्या ६५४६ आहे. १४ दिवसांचे होम क्वारंटाईन पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या १९ हजार ९९० आहे. इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनची संख्या २० आहे. आरोग्य विभागांचा जिल्ह्यामध्ये कसून सर्वे सुरू असल्याचेदेखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.३५ लोकांना अटकसंपूर्ण जिल्ह्यामध्ये पोलिसांकडून कडेकोट नाकाबंदी करण्यात आली आहे. आतापर्यंत ३५ लोकांना अटक करण्यात आली आहे. विनाकारण फिरणाऱ्या ९६ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. २१५ वाहने ताब्यात घेण्यात आले असून चार लाख ४२ हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या