शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या कर्तव्यावर १३ हजार ३३४ कर्मचारी

By admin | Updated: October 7, 2014 23:31 IST

निवडणुकांमधील सुव्यवस्था आणि जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी प्रशासनाची चांगलीत कसरत सुरू आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकांमुळे सर्वत्र धावाधाव दिसत आहे.

चंद्रपूर : निवडणुकांमधील सुव्यवस्था आणि जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी प्रशासनाची चांगलीत कसरत सुरू आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकांमुळे सर्वत्र धावाधाव दिसत आहे. निवडणुका शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडाव्यात यासाठी कर्मचारी, अधिकारी आणि पोलीस मिळून १३ हजार ३३४ कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ गुंतविण्यात आले आहे.अधिकारी व कर्मचारी मिळून ९ हजार ८३४ मनुष्यबळाचा समावेश आहे. तर कायदा व सुव्यवस्थेसाठी ४ हजार ५०० पोलीस अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. निवडणुकांतील मतपेट्या आणि कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी १८४ बसेस, ५० मिनीबसेस, ४०० जिपगाड्या व २० ट्रक अशा मिळून ६५४ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.यातही गरज पडलीच तर आवश्यकतेप्रमाणे खासगी वाहनेसुद्धा भाडे तत्वावर घेण्यात येणार आहेत.निवडणूक कामासंदर्भातील माहिती देण्यासाठी मंगळवारी दुपारी जिल्ह्याधिकाऱ्याननी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ही माहिती देण्यात आली. पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी दामोधर नान्हे, नोडल आॅफिसर (खर्च) संतोष कंदेवार उपस्थित होते.सहाही मतदार संघात मिळून १७ लाख ५९ हजार १४६ मतदार आहेत. २७ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या पुरवणी यादीमध्ये ८ हजार २५३ मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. ९२.२६ टक्के मतदारांना फोटो ओळखपत्र देण्यात आले आहेत.गैरहजर, स्थलांतरीत व मृत मतदाराची वेगळ्याने नोंद घेण्याच्या सूचना आयोगाने दिल्याने ते काम सुरु आहे. निवडणूक कर्तव्यावरील सर्वांना टपाली मत पत्रिका देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात एकूण ६१ लाख ९० हजाराची रक्कम जप्त करण्यात आली असून चार दारूची दुकाने सिल करण्यात आली आहेत.तर पाच दुकानांना निलंबीत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. जिल्हा प्रशानाने सुरू केलेल्या टोल फ्रि क्रमांकावर २०० तक्रारी प्राप्त झाल्या असून त्या सोडविण्यात आल्या आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)