१०६ वर्षांच्या नागभीड- नागपूर रेल्वेला अखेरचा निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 06:00 IST2019-11-25T06:00:00+5:302019-11-25T06:00:39+5:30

बहुचर्चित नॅरोगेज रेल्व नागभीडवरून नागपूरसाठी दुपारी ४.४५ वाजता सुटते. या गाडीचे इंजिन यावेळी सजविण्यात आले होते. आठवण म्हणून अनेकांनी सजविलेल्या इंजिनसोबत सेल्फी व छायाचित्र काढून घेतले. विशेष म्हणजे, केवळ प्रवासाची आठवण म्हणून अनेकांनी कोटगाव, मांगली, कानपा, भूयार, भिवापूर गावापर्यंत या गाडीने प्रवास केला. ही रेल्वे ज्या स्थानकावर थांबत होती. त्या ठिकाणी नागरिक व प्रवाशांकडून उस्फुर्तपणे स्वागत केल्या जात होते.

106-year-old Nagbhid - Last message to Nagpur Railway | १०६ वर्षांच्या नागभीड- नागपूर रेल्वेला अखेरचा निरोप

१०६ वर्षांच्या नागभीड- नागपूर रेल्वेला अखेरचा निरोप

ठळक मुद्देउरल्या केवळ आठवणी : सजविलेल्या इंजिनसोबत प्रवाशांनी काढली सेल्फी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : १०६ वर्षांपासून अव्याहत सुरू असलेल्या नागभीड-नागपूर या बहुचर्चित नॅरोगेज रेल्वेला रविवारी अखेरचा भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी शेकडो प्रवाशांसह खासदार अशोक नेते, बिलासपूर रेल्वे झोन कमिटीचे सल्लागार सदस्य संजय गजपुरे, नगराध्यक्ष उमाजी हिरे, उपाध्यक्ष गणेश तर्वेकर, सभापती अवेश पठाण, न.प. सभापती सचिन आकूलवार आदी उपस्थित होते. आता केवळ या गाडीच्या १०६ वर्षांच्या आठवणी प्रवाशांसह रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शिल्लक राहिल्या आहेत.
बहुचर्चित नॅरोगेज रेल्व नागभीडवरून नागपूरसाठी दुपारी ४.४५ वाजता सुटते. या गाडीचे इंजिन यावेळी सजविण्यात आले होते. आठवण म्हणून अनेकांनी सजविलेल्या इंजिनसोबत सेल्फी व छायाचित्र काढून घेतले. विशेष म्हणजे, केवळ प्रवासाची आठवण म्हणून अनेकांनी कोटगाव, मांगली, कानपा, भूयार, भिवापूर गावापर्यंत या गाडीने प्रवास केला. ही रेल्वे ज्या स्थानकावर थांबत होती. त्या ठिकाणी नागरिक व प्रवाशांकडून उस्फुर्तपणे स्वागत केल्या जात होते. या गाडीला १०६ वर्षांचा इतिहास असल्याने संपूर्ण तालुक्याच्या भावना या गाडीशी जुळल्या आहेत. किंबहुना नागभीड येथूनच गोंदिया, बल्लारपूर व नागपूर येथे गाड्या रवाना होत असल्याने येथे जंक्शनची निर्मिती झाली होती.
एवढेच नाही तर अगदी २० वर्षांपूर्वी पर्यंत नागभीड येथे इंजिन दुरूस्तीचे वर्कशाप कार्यरत होते. यामुळे नागभीड शहराचे नाव सर्वदूर पोहोचले. कृतज्ञतेची ही भावना प्रत्येकाच्या चेहºयावर दिसत होती. अनेकांनी या रेल्वेच्या आठवणी एकमेकांना सांगताना दिसले.

२२ महिन्यांत होणार काम पूर्ण
नव्या ब्रॉडगेजचे काम १ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. बांधकाम करणारी कंपनी २२ महिन्यांत काम पूर्ण करणार असल्याची माहिती सूत्रानी दिली. ब्रॉडगेजचे काम पूर्ण झाल्यानंतर नागपूरवरून दक्षिणेकडे जाणाºया अनेक गाड्या नागभीडमार्गे वळविण्यात येणार आहेत. ब्रॉडगेज रेल्वेमुळे नागभीड- नागपूर हे अंतर केवळ दीड तासाचे होणार आहे. त्यामुळे या तालुक्याचा नागपूर शहराशी दररोजचा संपर्क पुन्हा वाढणार आहे. यातून शेतमाल विक्रीसाठी नागपूरची मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.
असाही एक रेल्वे प्रवाशी...
या गाडीन रविवारी गोवा येथील एका पर्यटकाने प्रवास केला. विजय अभ्यंकर असे या पर्यटकाचे नाव आहे. देशातील कुठेही नॅरोगेज गाड्या बंद झाल्याची माहिती मिळताच अभ्यंकर हे तातडीने त्या रेल्वेस्थानकावर जातात. त्या गाडीने प्रवास करतात. नागभीड-नागपूर गाडीतही त्यांनी प्रवास केला.

Web Title: 106-year-old Nagbhid - Last message to Nagpur Railway

टॅग्स :railwayरेल्वे