शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

आगीत १० गोठे जळून खाक

By admin | Updated: May 23, 2015 01:22 IST

राजुरा तालुक्यातील पोवनी येथे आज गुरुवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास गोठ्यांना आग लागली. यामुळे गावात तारांबळ उडाली.

१२ लाखांचे नुकसान : दोन बैल जखमी; एका वासराचा मृत्यूगोवरी : राजुरा तालुक्यातील पोवनी येथे आज गुरुवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास गोठ्यांना आग लागली. यामुळे गावात तारांबळ उडाली. नागरिकांनी मिळेल त्या भांड्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र उन्हाळा असल्यामुळे आग आणखी वाढत गेली. तब्बल १० गोठ्यांना आगीने कवेत घेतले. या आगीत तब्बल १० लाखांहून अधिक नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढविले आहे.या घटनेत सर्वप्रथम हरिश्चंद्र कावळे यांच्या गोठ्याला आग लागली. मात्र ही आग लागल्याचे लक्षात आले तेव्हा बाजूला असलेल्या विजय आमने, दत्तु बोढे, दशरथ खिरटकर, मुर्लीधर सदाफळे, बंडू पिंपळकर, बाबा कावळे, मुर्लीधर वांढरे, मुर्लीधर पिंपळकर तर शंकर झिल्लेवार यांच्या घरातील गोठ्यांनाही आग लागली. पाहता पाहता आगीने जनावरांचे दहा गोठे कवेत घेतल्यानंतर पाण्यासाठी गावकऱ्यांनी धावाधाव केली. या आगीत दत्तु बोढे यांच्या गोठ्यातील एका वासराचा जळून मृत्यू झाला तर मुर्लीधर सदाफळे यांचे गोठ्यात बांधून असलेले दोन बैल जखमी झाले. गोठ्यात कडबा, कुटार, वखर, नांगर, मोटरपंप पाईप, शेती उपयोगी सर्व अवजारे जळून खाक झाले. या आगीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मागील बाजूस असलेले सर्व गोठे क्षणार्धात जळून खाक झाले. मात्र यावेळी वाऱ्याचा वेग मंदावल्याने शाळेला आग लागली नाही. शंकर झिलेवार यांच्या घराला आगीने कवेत घेण्याआधीच गावकऱ्यांच्या सतर्कतेने आग विझविण्यात आली. किसन एकरे यांचे घर आगीतून बचावले. आग विझविण्यासाठी राजुरा, बल्लारपूर व अंबुजा सिमेंट कंपनीच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र तोपर्यंत आगीत दहा गोठे जळून खाक झाले होते. गोठ्याला लागून असलेल्या समाज भवानाच्या इमारतीत बाबा कावळे यांचे रासायनिक खताचे गोडावून होते ते ग्रामपंचायतीने किरायाने दिले होते. आगीत त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आगीचा पंचनामा तलाठी वी.बी. शेख यांनी केला. यावेळी ग्रामसेवक सचिन विरुटकर व गावकरी उपस्थित होते. ही आग शार्टशर्किटने लागली.(वार्ताहर) पाचगाव येथेही आगपाचगाव येथे लागलेल्या आगीत अनिल कुरवटकर व महादेव कुरवटकर यांचे घर जळाले. मात्र गावकऱ्यांच्या सतर्कतेने आग विझविण्यात आली. यात त्यांचेही मोठे नुकसान झाले असून त्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे.