सरकारी नोकरीची संधी! सर्वोच्च न्यायालयात विविध पदांसाठी भरती, कोण करू शकतं अर्ज? पात्रता काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 17:44 IST2026-02-21T17:42:28+5:302026-02-21T17:44:52+5:30

Supreme Court Recruitment 2026: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आहे. सर्वोच्च न्यायालयात विविध पदांसाठी भरती निघाली आहे.

Supreme Court Recruitment 2026: Vacancies Announced for Assistant Editor, Librarian, and Other Posts; Apply from Feb 23 | सरकारी नोकरीची संधी! सर्वोच्च न्यायालयात विविध पदांसाठी भरती, कोण करू शकतं अर्ज? पात्रता काय?

सरकारी नोकरीची संधी! सर्वोच्च न्यायालयात विविध पदांसाठी भरती, कोण करू शकतं अर्ज? पात्रता काय?

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने विविध पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. येत्या २३ फेब्रुवारीपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार असून ८ मार्च अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर कोणत्याही उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. दरम्यान, या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी सर्वोच्च न्यायालयाचा अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

या भरती मोहिमेद्वारे एकूण २२ जागा भरल्या जाणार आहेत, ज्यात सहायक संपादक (SC Reports)- ५ जागा, सहायक संचालक (SC Museum)- १ जागा, वरिष्ठ न्यायालय सहायक (Museum)- २ जागा आणि सहायक ग्रंथपाल (Assistant Librarian)- १४ जागांचा समावेश आहे. उमेदवारांची निवड तीन टप्प्यांत होईल. सर्वातप्रथम, उमेदवाराची लेखी परीक्षा होईल. त्यानंतर संगणक पात्रता चाचणी आणि शेवटी मुखालत होईल.  

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

सहायक संपादक: कायद्याची पदवी आणि किमान ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.
सहायक संचालक: संग्रहालयशास्त्रात प्रथम श्रेणीत पदव्युत्तर पदवी आणि ५ वर्षांचा संशोधन अनुभव.
वरिष्ठ न्यायालय सहायक: संग्रहालयशास्त्रात किमान ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी आणि २ वर्षांचा अनुभव.
सहायक ग्रंथपाल: ग्रंथालय विज्ञानातील पदवी, संगणक डिप्लोमा आणि २ वर्षांचा अनुभव.

अर्ज कसा करावा?

- सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- होमपेजवर असलेल्या 'Recruitment' लिंकवर क्लिक करा.
- नवीन नोंदणी करून लॉगिन आयडी तयार करा.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढून स्वतःकडे ठेवा.

Web Title : सुप्रीम कोर्ट भर्ती: विभिन्न पदों के लिए आवेदन करें, पात्रता जांचें!

Web Summary : सुप्रीम कोर्ट ने सहायक संपादक, निदेशक और लाइब्रेरियन सहित 22 विभिन्न पदों के लिए भर्ती की घोषणा की। 23 फरवरी से 8 मार्च तक ऑनलाइन आवेदन करें। चयन में लिखित परीक्षा, कंप्यूटर टेस्ट और साक्षात्कार शामिल हैं। आधिकारिक वेबसाइट पर पात्रता मानदंड और आवेदन प्रक्रिया देखें।

Web Title : Supreme Court Recruitment: Apply for Various Posts, Check Eligibility Now!

Web Summary : Supreme Court announces recruitment for 22 various posts including Assistant Editor, Director, and Librarian. Apply online from February 23rd to March 8th. Selection involves written exam, computer test, and interview. Check eligibility criteria and application process on the official website.