शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

ताणतणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी करिअर ‘योग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 02:21 IST

मानवी मन आणि शरीर सुदृढ ठेवण्यासाठी योगाची उपयुक्तता आता सिद्ध झाली आहे.

मानवी मन आणि शरीर सुदृढ ठेवण्यासाठी योगाची उपयुक्तता आता सिद्ध झाली आहे. काही योगगुरूंनी अथक परिश्रम आणि निष्ठेने योगाचा प्रचार-प्रसार केला आहे. सध्याच्या काळात स्वत:ची तब्येत सुदृढ ठेवण्यासाठी आणि ताणतणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी योगसाधनेकडे वळणाऱ्यांंची संख्या लक्षणीयरीत्या वाढत आहे. त्यामुळे प्रशिक्षित योगगुरू वा योगतज्ज्ञांचीही गरज वाढली आहे. सध्या जगामध्ये योगाची भलतीच चलती आहे. जर लहानपणापासून तुम्हाला योग आणि व्यायामाची आवड असेल, इतरांना ते शिकवण्याची इच्छा असेल तर योग्य क्षेत्रातील करिअर संधी नक्कीच उपयुक्त ठरू शकतात.आजच्या धावपळीच्या जीवनात जिम, फिटनेस क्लब, व्यायामशाळा, योगशिक्षक/गुरूंकडे नियमित जाणाºयांची संख्याही वाढत आहे. विशेषत: योगाची महती विविध माध्यमांद्वारे सतत कानी पडत असल्याने बºयाच व्यक्ती आवर्जून योग शिकण्याचा प्रयत्न करत आहेत. योगशिक्षक वा गुरू म्हणून करिअर करण्यासाठी ही चांगली संधी आहे. हे करिअर कुणालाही आणि कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना करता येणे शक्य आहे. मात्र त्यासाठी अशा व्यक्तींनी स्वत: चांगल्या संस्थांमधून प्रशिक्षित होणे गरजेचे ठरते. शिवाय प्रशिक्षण घेतल्यानंतर सातत्याने सराव करून त्यात तज्ज्ञता मिळवावी लागेल. दर्जेदार प्रशिक्षण देण्यासाठी अशी तज्ज्ञता आणि कौशल्य आवश्यक आहे. येणाºया ग्राहकांना योगगुरूंच्या कौशल्याबद्दल खात्री निर्माण होणे आवश्यक ठरते. त्यामुळे अधिकाधिक ग्राहक वा प्रशिक्षणार्थी नियमितपणे मिळू शकतात. चांगल्या संस्थांमध्ये योग प्रशिक्षणासाठी प्रवेश घ्यावयाचा असल्यास किमान अर्हता कोणत्याही शाखेतील बारावी असणे गरजेचे आहे.>योगशास्त्रातील करिअरच्या संधीशिक्षण-आरोग्याच्या क्षेत्रात ‘योगशास्त्र’ हे मोठे दालन नव्याने निर्माण होते आहे. जगात झालेल्या योग प्रबोधनामुळे विविध देशांमध्ये योग शिक्षकांची मागणीही प्रचंड आहे. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयांतर्गत अनेक संधी उपलब्ध आहेत. योगशास्त्रात पदवी (बी.ए. इन योगशास्त्र) आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम (एम.ए. इन योगशास्त्र) या पदव्यांनंतरही जागतिक संधींचे दालन खुले होते. योगशास्त्रात पीएच.डी. करणाºयांनाही संशोधनात उत्तम संधी आहेत. आयुर्वेद आणि योग, संस्कृत आणि योग, औषधशास्त्र आणि योग यासारख्या मानवी जीवनाशी नित्य निगडित असणाºया विषयांमध्येही संशोधनाच्या मुबलक संधी उपलब्ध आहेत.>प्रवेशासाठी पात्रता : बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी डिप्लोमा इन योगशास्त्र हा अभ्यासक्रम उपलब्ध असून याचा कालावधी १ वर्ष आहे. बारावी उत्तीर्ण विद्यार्थी बी.ए. (योगशास्त्र) या तीन वर्षे पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात. तर एम.ए. (योगशास्त्र) या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी कुठल्याही शाखेचा पदवीधर आणि योगशिक्षक किंवा कालिदास विद्यापीठाचा डिप्लोमा योगशास्त्र हा अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. चार सत्रे म्हणजे दोन वर्षे कालावधीचा हा अभ्यासक्रम आहे. विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) मान्यताप्राप्त हे अभ्यासक्रम करिअर संधींच्या वाटा खुल्या करून देणारे आहेत. याशिवाय संस्थेत योगप्रवेश, योग परिचय, योगशिक्षक, योग प्रबोध, योग प्रवीण, योग पंडित, योग अध्यापक व योग प्राध्यापक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.