शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

3 चुका : त्या कराल तर नवीन जॉब मिळणं तर सोडाच, आहे त्या नोकरीतही मिळेल डच्चू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 17:44 IST

नवी नोकरी शोधणं चुकीचं नाही, पण ती शोधताना अत्यंत कॉमन चुका केल्या तर आहे त्या नोकरीतही नारळच मिळेल!

ठळक मुद्देआपण नोकरी मागतोय, भीक नाही फ्रेण्डशिप नाही, हे लक्षात ठेवा!

आहे त्या नोकरीत मन न रमणं, नवीन चांगल्या कामाची, जास्त पगाराची नोकरी मिळावी असं वाटणं यात काही चूक नाही. पुढे जाण्याची संधी सगळ्यांनाच मिळायला हवी. मात्र ती पुढची संधी शोधताना आहे तिथं आपला पाय गाळात जातोय का याकडे जरा लक्ष द्या. अनेकदा आपल्याला वाटतं की आपल्याला सगळं कळतं, आपण चुकूच शकत नाही. पण अतीआत्मविश्वासामुळे आणि सोकॉल्ड कम्युनिकेशन स्किलमुळे आपण काही अत्यंत बावळट चूका करुन बसतो आणि त्यामुळे आपली आहे ती नोकरीही जायची वेळ येऊ शकते. तसं होऊ नये म्हणून या 3 चुका टाळाच!

1) वर्क इमेलने पाठवताय सीव्ही?आपल्या लक्षातही येत नाही पण आपल्या आहे त्या नोकरीचा जो कार्यालयीन कामाचा इमेल आयडी असतो त्यानं आपण दुसरीकडे नोकरीसाठी अर्ज करतो. सीव्ही पाठवतो. त्यानं दोन गोष्टी होतात. पहिली म्हणजे त्या लोकांच्या हे लक्षात येतं की, हा माणूस पुरेसा प्रोफेशनल नाही. गंभीर नाही. कामात लक्ष नाही. आपलं इम्प्रेशन तिथंच मातीत जातं.दुसरं म्हणजे जिथं आपण काम करतो तिथले लोक आपली मेल ट्रेस करु शकतात आणि आपण इथं धड काम करत नाही असा आपला पोलखोल होऊच शकतो.

2) बॉसच्या तक्रारींचा पाढानसेल आपल्याला आवडत आपला बॉस. लाख तक्रारी असतील. लाख वाईट वागत असेल तो आपल्याशी. पण ऑनलाइन इण्टरव्ह्यू देताना, मेल लिहिताना बॉसच्या तक्रारींचा पाढा वाचू नये. त्याला शिव्या देऊ नये. जग छोटं असतं, ती नोकरी मिळाली नाही पण बॉसला आपली ही कर्तबगारी समजली तर आहे त्या नोकरीत बॅण्ड वाजेल!

3) लोचट प्रेमप्रदर्शनआपण कसे कॉन्फिडण्ट आहोत हे दाखवण्यासाठी इमेलमध्ये लोचट प्रेमप्रदर्शन, ओव्हर फ्रेण्डली भाषा वापरु नका. कायमची फुली बसू शकते आपल्यावर हे लक्षात ठेवा.