शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या उत्पन्नातील २० टक्के वाटा भविष्यात करील जादुई करामत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 14:55 IST

सुखी भविष्य आणि आनंदी वर्तमानासाठी करुन पाहाच..

ठळक मुद्देज्या दिवशी तुम्ही नोकरीला लागाल किंवा कमाईला सुरुवात कराल, त्या दिवसापासून आपल्या कमाईतील किमान वीस टक्के रक्कम बाजूला काढा.त्याची योग्य ठिकाणी गुंतवणूक करा.आज वाचवलेले वीस टक्के तुम्हाला सुखी भविष्याची हमीच देणार नाही, तुमचं वर्तमानही ते आनंदी आणि उत्साही करेल.

- मयूर पठाडेआपल्याला जगण्यासाठी किती पैसे लागतात? खरंतर याचं उत्तर जितकं सोपं आहे तितकंच अवघडही आहे. कारण नुसतं जगण्यासाठी फारसा पैसा लागत नाहीच, पण आपल्या वेगवेगळ्या अपेक्षा, गरजा आणि अडचणीच्या प्रसंगात किती पैसा आपल्याला लागेल याची मात्र काहीच शाश्वती नसते. त्यासाठी आपल्या हाती काही पुंजी असणं आवश्यक असतं. काही गरजा तर निव्वळ आर्थिक असतात.तुम्ही जर काही लोन घेतलेलं असेल, तर त्याचे हप्ते भरायचे असतात. हे हप्ते जर वेळेवर भरले गेले नाहीत, तर त्यावर मोठा दंड बसू शकतो. भवितव्यासाठी काही गुंतवणूक करावी लागते. काही पैसा बाजूल काढून ठेवावा लागतो. रिटायरमेंटसाठी काही प्लॅनिंग करुन ठेवावं लागतं.या साºया गोष्टींसाठी वेळीच आपल्याला सारी तयारी करुन ठेवावी लागते. ती जर केली नाही, तर ऐनवेळी फारच तारांबळ होते आणि त्याचं टेन्शन खूप मोठं असतं.त्यासाठीचा एक सर्वात सोपा उपाय आहे. तुम्ही अगदी विद्यार्थी दशेपासूनच स्वत:ला बचतीची आणि काही पैसे बाजूला काढून ठेवण्याची सवय लावली पाहिजे. अगदी आपल्याला जो पॉकेटमनी मिळत असेल तर त्यातूनही काही पैसा बाजूला काढला पाहिजे. मात्र त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे तुम्ही ज्या दिवशी तुम्ही नोकरीला लागाल किंवा जेव्हा कुठल्याही माध्यमातून तुम्ही कमाईला सुरुवात कराल, अगदी त्या दिवसापासून तुम्ही आपल्या कमाईतील किमान वीस टक्के रक्कम बाजूला काढली पाहिजे. त्याची योग्य ठिकाणी गुंतवणूक केली पाहिजे. अनेक जणांना काही अघटित घडल्यावर किंवा उतारवयात जाग येते, आपण काहीच प्लॅनिंग केलं नाही याचं. तसं करणं धोक्याचं आहे. आज आपल्या कमाईतले वाचवलेले वीस टक्के तुम्हाला नुसतं योग्य आणि शाश्वत, सुखी भविष्याची हमीच देणार नाही, तुमचं वर्तमानही ते आनंदी आणि उत्साही करेल.त्यासाठी कराल एवढं? काढाल आजपासूनच आपल्या कमाईतील वीस टक्के वाटा बाजूला?..